UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकचा निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहे. अशातच मतमोजणीपूर्वी समाजवादी पक्षाने ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ईव्हीएम अदलाबदल किंवा कोणताही गैर प्रकार घडू नये म्हणून समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या उमेदवारांना ईव्हीएमवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचंच पालन करत मेरठच्या हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून सपाचे उमेदवार योगेश वर्मा हे ईव्हीएमवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क दुर्बीण घेऊन मैदानात उतरले आहेत.    


याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ''या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात आले आहेल. आम्ही दुर्बिणीद्वारे पाहत आहोत की, येथे कोणताही गैर प्रकार तर घडत नाही आहे ना. आम्ही दुर्बिणीद्वारे छतावर आणि संपूर्ण परिसरावर बारीक लक्ष ठेवून आहोत.''  योगेश वर्मा पुढे म्हणाले की, या कामासाठी आम्ही 8-8 तासांच्या 3 शिफ्ट केल्या आहेत. ज्याच्या आधारे आता ते तैनात आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असल्याचे ते म्हणाले आहेत.


योगेश वर्मा म्हणाले की, ''आमचा लढा सत्ताधारी पक्षाविरुद्ध असून गेल्या वर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या निवडणूक नियमांचे घोर उल्लंघन पाहिल्यानंतर जनतेची मते गमावणे आम्हाला परवडणारे नाही.''


10 मार्चला निकाल 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. मेरठ जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. येथे दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मोदीपुरम येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात तीन विधानसभांच्या मतांची मोजणी होणार आहे. तर दुसरीकडे नवीन फल मंडी, हापूर रोड, लोहिया नगर येथे चार विधानसभा जागांसाठी मतमोजणी होणार आहे.


संबंधित बातम्या: