जळगाव : उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले भाजपचे खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) हे महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा जळगावमध्ये (Jalgaon) रंगू लागल्या आहेत. भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील (BJP MP Unmesh Patil) उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापत स्मिता वाघ (Smita Vagh) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खासदार उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा
उन्मेष पाटील (Unmesh Patil) दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून असल्याची चर्चा आहे. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची उन्मेष पाटील यांनी भेट घेतल्याची राजकीय क्षेत्रात चर्चा आहे. मी कुणाचीही भेट घेतलेली नाही, मी भाजपचा कार्यकर्ता असून प्रामाणिकपणे भाजपचे काम करणार असल्याची फोनवरून बोलताना उन्मेष पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उन्मेश पाटील मविआच्या वाटेवर?
भाजप खासदार उन्मेश पाटील मविआच्या वाटेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, उन्मेष पाटील यांनी मात्र याचा स्पष्ट शब्दात इंकार केला आहे. नाराज असल्यामुळे उन्मेष पाटील हे मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या जिल्हा बैठकीला गैरहजर राहिले होते,त्यातूनच या चर्चा रंगू लागल्या आहेत.
गिरीश महाजन काय म्हणाले?
भाजप नेते गिरीश महाजन यांनी या विषयावर कानावर हात घेतला आहे. मला याबद्दल काहीही माहिती नाही, उन्मेष पाटील यांच्याशी फोनवर बोलण झालेलं नाही. फोनवर बोलणं झालं की तुम्हाला सांगतो, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :