Umred Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. दरम्यान, नागपुरातील 12 मतदारसंघातील  उमरेड विधानसभा मतदारसंघातही (Umred Vidhan Sabha Election) काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम तर भाजपकडून सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार, असा अंदाज असताना भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे हे अचानक 'रेस' मध्ये आले. त्यामुळे येथे तिहेरी लढत रंगली. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरेड या मतदारसंघात आजवर काँग्रेसच्या मतांचे विभाजन होत आले आहे. मात्र, यंदा भाजपचे बंडखोर प्रमोद घरडे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांच्या मतांवर 'रेड' टाकली व काँग्रेसचे संजय मेश्राम 85,372 मते मिळवत विजयी झाले आहे.


उमरेड विधानसभेत काँग्रेसचा विजय  



  • संजय मेश्राम (काँग्रेस) - विजयी
    मिळालेली मते - 85,372
    मतदान -39.54%


सुधीर पारवे (भाजप) - पराभूत


मिळालेली मते 72,547


मतदान- 33.60%
नोटा -1263


संजय मेश्राम यांच्या विजयाची कारणे काय?


काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात अधिक सक्रिय न राहता संजय मेश्राम हे उमरेड मतदार संघातील सामान्य लोकांशी कनेक्ट राहिले. लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदार संघात काँग्रेसचा विजय झाला. यात उमरेड मतदार संघात काँग्रेसला मिळालेली लीड त्यांनी कायम ठेवली. तसेच 'पारवे' या नावाविरोधात मतदारांत असलेला रोष त्यांनी कॅश केला.


उमरेड विधानसभा इतिहास काय?


नुकत्याच पार पडलेली रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाल्याने भाजपची नामुष्की झालीय. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आणि 2019 मध्ये काँग्रेसकडून उमरेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राजू पारवे यांचा मात्र 2024 चा लोकसभेत पराभव झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू पारवे विजयी झाले होते. काँग्रेसचे राजू पारवे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा 18 हजार 26 मतांनी पराभव केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत लोकसभा निवडणुक लढवली. त्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.


विदर्भातील संपूर्ण 62 मतदारसंघाचा निकाल 


१) चंद्रपूर - भाजप 5, काँग्रेस-1


2 )गडचिरोली -
भाजप -1
काँग्रेस -1
अजित पवार -1


3) अमरावती
भाजप 5, 
 युवा स्वाभिमान 1, अजित पवार 1, ठाकरे गट -1


4) यवतमाळ
भाजप - 3,
कॅाग्रेस 1, 
अजित पवार - 1, 
शिंदे - 1 
ठाकरेंची शिवसेना - 1 
 
5) गोंदिया
भाजप 3,
अजित पवार -1


6) भंडारा
भाजपा -1, 
शिंदे सेना १, 
अजित पवार १ 


7) अकोला
भाजप -3 
काँग्रेस -1
उद्धव ठाकरे -1


8) वर्धा
भाजप 4, 
कॅाग्रेस 0



9) बुलडाणा-  
भाजप 4, 
अजित पवार 1
 शिंदे 1,
उद्धव ठाकरे 1


10) नागपुर जिल्हा 
भाजप - 8
काँग्रेस - 3
शिंदे गट - 1



११) वाशिम 
भाजप 2
काँग्रेस -1


 


१)भाजपा- 39
२)शिवसेना शिंदे-4
३)राष्ट्रवादी अजित पवार -6
४)काँग्रेस-8
५)शिवसेना युबिटी- 4
६)राष्ट्रवादी शरद पवार - 0
७)मनसे - 0
८)इतर -1( युवा स्वाभिमान )



महायुती - 50( युवा स्वाभिमान सह )
मविआ-12
इतर


हे ही वाचा