Nagpur District Vidhan Sabha Election 2024 : Nagpur District Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 (Vidhan Sabha Election 2024) आता थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. काही वेळातच सुरुवातीचे कल हाती येतील. गेल्या अडीच वर्षात राज्यानं अनुभवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर राज्यातील मतदार राजानं कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं? हे आज स्पष्ट होणार आहे. राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती सोपवणार? याचा फैसला आज होणार आहे. अशातच, देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर(Nagpur) जिल्ह्यात यंदा कोणाची हवा असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेससह इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते यंदा नागपूरच्या 12 मतदारसंघातून रिंगणात उतरून एकमेकांविरुद्ध आव्हान देत असल्याचे चित्र होतं. त्यामुळे नागपूरच्या 12 मतदारसंघात महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे निकाला अंती पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांतील यशाचा आधार घेत आणि अपयशाला पाठीशी टाकत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यातच थेट सामना होणार असल्याचे दिसून येतंय. तर काही ठिकाणी मनसे आणि वंचितसह इतर पक्षही रिंगणात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागांवर विजय मिळवणारी महाविकास आघाडी तर 17 जागांवर विजय मिळवणाऱ्या महायुतीमध्ये लढाई आहे. मात्र, गेल्या लोकसभेला विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत मोठे यश संपादन केलं आहे. त्यामुळे या विधानसभेत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
(Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.)
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महायुती उमदेवार | महाविकास आघाडी | वंचित/अपक्ष/इतर | विजयी उमेदवार |
1 | नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा | देवेंद्र फडणवीस (भाजप) | प्रफुल्ल गुडधे(काँग्रेस) | ||
2 | नागपूर दक्षिण विधानसभा | मोहन मते (भाजप) | गिरीश पांडव (काँग्रेस) | अनुप दुरुगकर (मनसे) | |
3 | नागपूर पूर्व विधानसभा | कृष्णा खोपडे (भाजप) | दुनेश्वर पेठे (NCP-SP) | आभा पांडे (अपक्ष) | |
4 | नागपूर मध्य विधानसभा | प्रविण दटके (भाजप) | बंटी शेळके (काँग्रेस) | रमेश पुणेकर (अपक्ष) | |
5 | नागपूर पश्चिम विधानसभा | सुधाकर कोहळे (भाजप) | विकास ठाकरे(काँग्रेस) | प्रकाश गजभिये (बसपा) | |
6 | नागपूर उत्तर विधानसभा | डॉ. मिलिंद माने (भाजप) | डॉ. नितीन राऊत (काँग्रेस) | मनोज सांगोळे (बसपा) | |
7 | काटोल विधानसभा | चरणसिंग ठाकूर (भाजप) | सलील देशमुख (NCP-SP) | अनिल देशमुख (NCP-AP) | |
8 | कामठी विधानसभा | चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) | सुरेश भोयर (काँग्रेस) | विक्रांत मेश्राम (बसपा) | |
9 | उमरेड विधानसभा | सुधीर पारवे (भाजप) | संजय मेश्राम (काँग्रेस) | प्रमोद घरडे (अपक्ष) | |
10 | सावनेर विधानसभा | डॉ. आशिष देशमुख (भाजप) | अनुजा सुनील केदार (काँग्रेस) | घनश्याम निखाडे (मनसे) | |
11 | हिंगणा विधानसभा | समीर मेघे (भाजपा) | रमेशचंद बंग (NCP-SP) | डॉ. देवेंद्र कैकाडे (बसपा) | |
12 | रामटेक विधानसभा | आशिष जयस्वाल (शिंदेसेना) | विशाल बरबटे (शिवसेना ठाकरे गट) | राजेंद्र मुळक (अपक्ष) |
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12 (Nagpur MLA List)
-
काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
-
सावनेर विधानसभा - सुनील केदार (काँग्रेस)
-
हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
-
उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
-
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
-
नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते (भाजप)
-
नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
-
नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)
-
नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
-
नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
-
कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)
-
रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
हे ही वाचा