एक्स्प्लोर

मी इतरांच्या मुलांचे हट्ट पुरवतो, त्यांना धुणीभांडीसाठी वापरत नाही, उद्धव ठाकरेंचा पवारांना चिमटा

मी इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी सुजय विखे पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला

मुंबई : माझ्या मुलांसोबत इतरांच्या मुलांचेही हट्ट पुरवतो, म्हणून शिवसेना सर्वसामान्यांचा पक्ष, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर आले होते. इतरांच्या पोरांचाही मी विचार करतो. दुसऱ्यांची पोरं धुणीभांडी करण्यासाठी वापरुन घेत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पवारांवर बोचरी टीका केली. दोन्ही पक्षाकडून दगाफटका होणार नाही, अशी हमी यावेळी उद्धव ठाकरेंनी सुजय विखेंना दिली. सुजय विखे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातो. अमुक एका जागेचा हट्ट करतो. त्यांचा बालहट्ट पुरवण्याची जबाबदारी इतर पक्षांची नाही, आपल्या मुलाचा हट्ट ज्यानं त्यानं पुरवावा. माझ्या घरातला मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, असाटोला पवारांनी काल लगावला होता.
माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल? : शरद पवार
शरद पवार हे अष्टपैलू आहेत. नेते म्हणून ते चांगले आहेत, पण भविष्य कधीपासून सांगायला लागले माहित नाही. ज्योतिषी म्हणून त्यांची ओळख नवीन आहे. जसं आम्ही बोलतो, ते करुन दाखवतो, तसं ते बोलल्याच्या विरुद्ध करतात, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला. लोकसभेची यादी लवकरच लोकसभा उमेदवारांची यादी तयार आहे. एक-दोन दिवसात यादी जाहीर करणार आहोत. 48 पेक्षा जास्त जागा तर जिंकू शकत नाही, मात्र सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न असेल, असंही उद्धव यांनी सांगितलं.
लोकसभेसाठी शिवसेनेचे महाराष्ट्रातील संभाव्य 23 उमेदवार
जालन्याच्या जागेच्या तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. माझ्याकडे ते येतील आणि समोरासमोर बोलणं होईल, त्यानंतर निर्णय होईल, असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. युतीत मिठाचा खडा कोण टाकू शकत नाही, असंही उद्धव यांना वाटतं.
आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात नाहीत आदित्य ठाकरे यांच्यावर माझं कोणतंही बंधन नाही. निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय तो आणि शिवसैनिक घेतील. मात्र यंदा तरी तो निवडणूक लढवणार नाही, असं स्पष्टीकरण उद्धव यांनी दिलं.
जालन्याचा तिढा सुटला, दानवेच उमेदवार; ईशान्य मुंबईचं काय होणार?
निवडणुकीच्या रणनीतीचा कच्चा आराखडा काल तयार झाला, सर्व निर्णय झाले आहेत. आणखी बरेच पत्ते आहेत ते आता उघडायचे नाहीत, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget