सातारा : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावर (Seat Sharing) अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. उमेदवारी मिळण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत, तर काही नाराज नेते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचीही चर्चा आहे. साताऱ्यामध्ये (Satara) खासदार उदयनराजे भोसलेंना अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. असं असलं तरी भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosle) लोकसभा उमेदवारीसाठी (Lok Sabha Election 2024) पक्षाला वारंवार संकेत दिले आहेत. उमेदवारीसाठी (Satara Lok Sabha Constituency) प्रयत्नशील असलेले उदयनराजे आता दिल्ली दरबारी जाणार आहेत.
उदयनराजे भोसलेंची दिल्लीवारी
भाजपच्या पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने खासदार उदयनराजे भोसले नाराज असल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. उदयनराजे भोसले सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक आहे. त्यामुळे आता उदयनराजे थेट दिल्ली दरबारी जाणार आहे. उदयनराजे बुधवारी रात्री दिल्लीसाठी रवाना झाल्यानंतर गुरुवारी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेतली होती. मात्र, त्यातही त्यांची नाराजी दूर न झाल्याने ते आता दिल्लीला जाणार आहेत.
उदयनराजे भोसले थेट दिल्लीत धडकणार
राज्यसभेचे खासदार असलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपकडून सातारा मतदारसंधाच्या उमेदवारीचा निर्णय होत नसल्याने उदयनराजे बुधवारी रात्री दिल्लीला जाणार असून गुरुवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील महायुतीत सातारा लोकसभेची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या उदयनराजेंनी पाच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, त्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
फडणवीसांच्या भेटीनंतरही गॅरंटी नाही
महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्य बंद दाराआड चर्चाही झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांच्या दोन तास चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. मात्र, या बैठकीतही उदयनराजेंचं समाधान झालेलं नाही. फडणवीसांच्या भेटीनंतरही उदयनराजे भोसले नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले हा मुद्दा घेऊन थेट दिल्ली दरबारी जाणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :