बारामती: बारामतीत (Baramati) पुतण्याने काकांना आवाहन दिले आहे. मात्र अजित दादांनी (Ajit Pawar) तेथे काम केले आहे.  तर युगेंद्र पवारने (Yugendra Pawar) फॉरेनला दिवस काढले आहेत. त्याने त्याचे आयुष्य तसेच काढावे. ज्यावेळेस काम करायचे होते तेंव्हा काही केले नाही आणि ज्यांनी काम केलेय ते दादांच आहते. हवशे-गवशे असतात तसे कोण नाही म्हणून पवार साहेबांनी सांगितले कोण नाही तर युगेंद्र पवारला उभं करून शरद पवार साहेबांनी युगेंद्रला बळीचा बकरा बनवलं, असा जळजळीत टोला भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.


काँग्रेसच्या सरकारने चांगल्या घोषणा केल्या, मात्र..


शरद पवार म्हणतात गद्दारी केली, मग तुम्ही पंच्चावन्न-साठ वर्ष घोषणा केल्या, लोकांच्या कामाची पूर्तता केली नाही. याच्याएवढीतर मोठी गद्दारी होऊ शकत नाही. गद्दारी कोणी केली. तर काँग्रेस, पवार या लोकांनी गद्दारी केली, लोकांच्या भावनेशी खेळ केला. खरे गद्दार तेच आहेत. शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावनेची भावना होती, लोकांचा सहभाग राज्यकारभारात रहावा, असा छत्रपती शिवरायांनी विचार मांडला. काँग्रेसच्या सरकारने केंद्रात नाही तर संपुर्ण देशाच्या राज्यात अनेक चांगल्या घोषणा केल्या, मात्र त्या नुसत्या घोषणाच होत्या. किसान, जवान, महिला, तरुण यांच्या बाबतीत कोणतेही धोरणे साठ वर्षात राबवली नाहीत. मात्र गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली चांगल्याप्रकारे केंद्रात सत्ता आली. छत्रपतींच्या विचाराचे अभिप्रेत असनारे विचार नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर त्या आचरणात आणल्या. असेही खासदार उदयनराजे म्हणाले. 


शरद पवारांकडून अपेक्षा करणे अन्यायकारक- उदयनराजे भोसले 


तुतारी, मशाल, हाताचा पंजा चिन्ह आहे. त्यात हाताचा पंजा तर काय बोलायचे, ऐन पिकमध्ये काही त्यांनी काही केले नाही. मशाल –मशाल घेऊन शोधाव लागतय, त्यांनी कुठ काम केल, एकही काम नाही. तुतारी तर वा एवढे वर्ष पवार साहेबांनी घोषणाबाजी खिरापत केली, नुसती तुतारी वाजवली, केल काय? शरद पवारांनी ऐन  तारुण्याच्या काळात जे केले नाही ते आता त्यांच्याकडून अपेक्षा करणे अन्यायकारक आहे, असा घाणाघातही खासदार उदयनराजे यांनी केलाय. 


राज्यभरात आज 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. राज्यातील काही मतदारसंघामध्ये तगडी लढत होणार आहे, त्यापैकी एक म्हणजे बारामती (Baramati). बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात लढत आहे. यादरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यावरुन खासदार उदयनराजे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. 


हे ही वाचा