मुंबई: राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता शपथविधीसाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री पदी कोण असणार याच्या अनेक चर्चा गेल्या काही दिवसात रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घ्यावी असं म्हटलं आहे.
माध्यमांशी बोलताना उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, काल आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मी काल देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. गिरीश महाजन वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांना भेटले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यांच्याच चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. आमच्या सर्वांची इच्छा आहे. आम्ही शिवसेनेचे जेवढे आमदार, खासदार आहोत. आमचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं उदय सामंत म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही, शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सर्व नेत्यांची, आमदारांची, खासदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असंही उदय सामंत पुढे म्हणालेत.
राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून शिवसेना आमचे भूमिका मांडण्याचा आणि आमचं मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी, ही आम्हाला खात्री आहे आणि आम्ही केलेल्या आग्रह महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मी पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रात संघटन करेल, संघटनेसाठी काम करेन, पण आम्हाला फक्त तेवढंच नकोय. आम्हाला स्वतःला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं. त्यांनी प्रशासनामध्ये जावं. त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत, त्याच्यामुळे सरकार येण्यामध्ये ताकद मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी सरकारमध्ये राहावं, त्या योजना पुर्णत्वास न्याव्यात ही आम्हा सर्वांची इच्छा आहे असे उदय सामंत यांनी पुढे म्हटले आहे.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024
(Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137