Shukra-Shani Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला सुख-समृद्धी, धन-वैभव आणि संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. ज्या राशींच्या लोकांवर शुक्राची (Venus) कृपादृष्टी असते अशा राशीच्या लोकांना कधीच संकटांचा सामना करावा लागत नाही. शुक्र ग्रह ठराविक वेळेनुसार राशी परिवर्तन करतात. नुकतंच 2 डिसेंबरच्या दिवशी शुक्राने राशी परिवर्तन केलं होतं आता 28 डिसेंबर रोजी शुक्र पुन्हा राशी परिवर्तन करणार आहे. 


नवीन वर्ष 2025 च्या आधी शुक्र ग्रह शनी च्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याचा शुभ प्रभाव 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


द्रिक पंचांगानुसार, 28 डिसेंबर शनिवारी शुक्र ग्रहाच्या द्वारे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी हे राशी परिवर्तन होणार आहे. याचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी शुक्र-शनीची युती फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. सामाजिक कार्यात तुमचं योगदान महत्त्वाचं ठरेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी शनी-सूर्याची युती फार लाभदायक ठरणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, परदेशात जाण्याच्या संधी तुमच्यासाठी मोकळ्या होतील. या काळात तुम्ही गुंतवणूक देखील करू शकतात. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांच्या या काळात धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली असेल. शुक्र ग्रहाची तुमच्यावर कृपादृष्टी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कुंभ राशीच्या लोकांना या काळात चांगलाच फायदा मिळू शकतो. या राशीच्या लोकांवर शनी-शुक्राचा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. नात्यात टिकून राहील. 


मीन रास (Pisces Horoscope)


शुक्र आणि शनी ग्रहाच्या युतीने मीन राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या दरम्यान तुमची तब्येत चांगली असेल. तसेच, तुम्हाला धनसंपत्तीचा चांगला लाभ मिळेल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; सिंहसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाची कृपा