एक्स्प्लोर

उद्योजक रामदास माने माढ्यातून लोकसभा निवडणूक लढणार

'टॉयलेट मॅन' म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत.

मुंबई : 'टॉयलेट मॅन' म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. साताऱ्यातील एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते एक प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक असा त्यांचा मोठा प्रवास साताऱ्यासह राज्यभरातील लोकांनी पाहिला आहेत. माढ्याचा विकास करण्याचे ध्येय घेऊन माने लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. पेनाची निब हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे. माढा मतदार संघात माने यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्यासोबत होणार आहे. रामदास माने यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर स्वतःचे मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माढा मतदार संघात गेल्या अनेक वर्षांपासून आपण भोगलंय. अनेक सरकारे आलीत आणि गेलीत, परंतु प्रचंड बेरोजगारी आणि काही भागात सतत पडणाऱ्या दुष्काळाने सर्व लोक त्रस्त झाले आहेत. माने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा व तुम्हाला (नागरिकांना) योग्य वाटेल त्या उमेदवाराला निवडून द्या. तसेच जो उमेदवार बेरोजगारीची आणि दुष्काळाची कायम स्वरुपी तीव्रता कमी करु शकेल, अशा उमेदवारास तुमचे मत द्या. माढा मतदार संघातल्या माण तालुक्यातील लोधवडे हे रामदास माने यांचे मूळ गाव आहे. त्यांचा जन्म लोधवडे येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी 10 वी पर्यंतचे शिक्षण घेतले. गावी केवळ कोरडवाहू शेती असल्यामुळे ते नोकरीसाठी पुण्याच आले. तिथे त्यांनी सुरुवातीला लहानसा उद्योग सुरु केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी जगातले सर्वात मोठे थर्माकॉल तयार करणारे मशीन बनवले. संपूर्ण भारतात आणि जगभरातील 45 देशात माने थर्माकॉल बनवण्याचा प्लान्ट, मशीनरीसह थर्माकॉल निर्यात करतात. थर्माकॉलपासून रेडिमेड आरसीसी टॉयलेट बनवून देशातल्या 17 राज्यांमध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर देत आहेत. आतापर्यंत त्यांनी 23 हजार टॉयलेट्स पुरवली आहेत. माने यांनी 25 नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता.

माझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांच्यासोबत प्रेरणादायी गप्पा

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...
शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र धाडलं; म्हणाले, साहेब...

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Embed widget