एक्स्प्लोर

तेलंगणा विधानसभा निवडणूक | अकबरुद्दीन ओवेसी विजयी

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसी यापूर्वी चार वेळा हैदराबादेतील चंद्रयानगुट्टा मतदारसंघातून विजयी झाले होते.

मुंबई : तेलंगणातून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून ओवेसी यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवली आहे. अकबरुद्दीन हे एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे धाकटे बंधू आहेत. भाजपने मुस्लिम कार्ड खेळत ओवेसींसमोर शहजादी सय्यद यांचं आव्हान ठेवलं होतं. तर टीआरएसच्या सीता रेड्डी यांचीही त्यांना टक्कर होती. चंद्रयान गुट्टा हा मतदारसंघ हैदराबाद लोकसभा क्षेत्रात येतो. पूर्वी हा मतदारसंघ आंध्र प्रदेशात होता, मात्र विभाजनानंतर तेलंगणाचा भाग झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ओवेसींनीही जागा 59 हजार 274 च्या मताधिक्याने जिंकली होती. यापूर्वी चार वेळा (1999,2004,2009 आणि 2014) अकबरुद्दीन ओवेसी या मतदारसंघातून विजयी झाले होते. ओवेसी बंधू प्रक्षोभक भाषणांमुळे चर्चेत असतात. तेलंगणात एमआयएमचे उमेदवार अनेक जागांवर आघाडीवर आहेत. मात्र संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर तेलंगणा विधानसभेचं चित्र स्पष्ट होईल. तेलंगणामध्ये टीआरएसने आघाडी घेतली असून काँग्रेस-टीडीपी आघाडीही चमक दाखवत आहे. मात्र भाजपचा तेलंगणात सुपडासाफ झाल्याचं चित्र आहे. दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य असलेल्या तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र आहे. तेलंगणामध्ये विधानसभेच्या 119 जागा असून बहुमतासाठी 60 जागा आवश्यक आहेत. सत्ताधाऱ्यांनी पाच महिने आधीच विधानसभा भंग केल्यानंतर 7 डिसेंबरला निवडणुका झाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget