धाराशिव : भर उन्हात थांबलेल्या सर्वांना वंदन करतो, तानाजीराव (Tanaji Sawant) तुमच्या प्रेमापोटी हे लोक आले आहेत. परंडा येथील किल्लेदार तानाजी सावंत यांची प्रचारसभा, ही विजयाची सभा आहे. तानाजी सावंत यांनी किल्ल्याची राखण हाती घेतली, त्याला खूप दिवस झाले. त्यांचा नाद करायचा नाही, तानाजीराव जादूगार आहेत, जादू करतात जादू, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा (Paranda) विधानसभा मतदारसंघातील सभेत मंत्री आणि शिवसेनेच्या बंडातील त्यांचे शिलेदार तानाजी सावंत यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. परंडा येथील जनतेच्या मनात काय आहे, हे गर्दीने ठरवलं आहे. 23 तारखेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) फटाखे फोडायला येतोय. धनुष्यबाण आमचा आहे, म्हणणाऱ्यांनी मशालही देऊन टाकली, असे म्हणत परंडा मतदारसंघात महाविकास आघाडीने जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतल्यावरुन एकनाथ शिंदेंनी नाव न घेता शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
बाळासाहेब यांचे विचार विकायला निघाल्यावर आम्ही उठाव करण्याचं धाडस केलं, तानाजीराव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण बान शान नियतीने आपल्यावर सोपवली आहे. गिनिज बुकमध्ये नोंद झाली असं काम तुमच्या पठ्ठ्या ने केलंय, असे म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेच्या बंडात तानाजी सावंत यांची भूमिका महत्त्वाची होती, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी आणि महायुतीने केलेली काम बघा, होऊन जाऊद्या दूध का दूध पाणी का पाणी. परंडा येथील विकासासाठी दीड हजार कोटी दिले, एकनाथ शिंदे देणारा आहे, घेणारा नाही. सभेसाठी मंडप घातला की निवडणूक खर्चात धरतात, आता वाचलेला हा खर्च डिसेंबरमध्ये महिलांच्या खात्यात टाकायचा आहे. आम्ही खात्यात पैसे टाकले, तेव्हा विरोधक म्हणाले, पैसे काढून घ्या माघारी घेतील. योजेनेबद्दल भिक, लाच, काय-काय बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना हे कळणार नाही. एकनाथ शिंदे शेतकऱ्याचं पोरगं आहे. मी आईची तगमग बघितली आहे. त्यामुळे, आचारसंहिता लागेल हे आम्हाला माहीत होत, म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे आम्ही देऊन टाकले. ज्यांचे पैसे आले नाही, त्यांचेही पैसे राहणार नाहीत हा शब्द देतो, असे म्हणत पुन्हा एकदा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.
उजनीचं पाणी कौडगाव इथं येईल
एकनाथ शिंदे आंदोलन, संघर्ष करून पुढे आला आहे. शेतकऱ्यांसाठी एकदा काय दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्या लाडक्या बहिणीला लखपती झालेलं मला पहायचं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला, आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही याची, तजवीज केलीय. शेतकऱ्यांना शेतीच बिल आपण माफ केलं आहे, आता सर्वांना एकूण बिलाच्या 30 टक्के सवलत देणार आहे. हा फक्त ट्रेलर आहे, असे म्हणत आणखी योजना लागू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचवले. निर्णय घ्यायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याला वाघाचे कातडे पांघरुन वाघ होत नाही. उजनीच पाणी कौडगाव इथ पडायला पाहिजे, ते होईल. तानाजीराव तुमचं काम बोलतोय. मतदार संघाचा 35 वर्षाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे, असेही शिंदेंनी म्हटले
हेही वाचा
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात