Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार हल्ला चढवत भाजपवर टीका केली आहे.
छगन भुजबळ जे म्हणताय ते खरं आहे, आम्ही आधी हेच बोलत होतो, मात्र आमचे आरोप राजकीय आहे, असे सांगितले जात होतं. भाजपमध्ये जी लोक गेली आहे ती सर्व ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवूनच गेली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हा भाजपने केला आहे. क्लीन चीट देणारे तेच आहेत, आरोप लावणारे ही तेच आहेत आणि भाजपमध्ये प्रवेश देणारेही तेच आहेत, असा घाणघात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय.
... तर अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे समाजात दुही वाढेल
अमित शहा आणि मोदी जितक्या सभा घेतील तितका महाविकास आघाडीला फायदा होईल, लोकसभेमध्ये त्यांनी जितक्या जास्त सभा घेतल्या तितकाच मोठा पराभव भाजपचा झालाय. तर लक्ष्मण हाके यांच्यावर जो हल्ला झाला असे हल्ले कुणावरही होऊ नये. जो तो आपल्या विचारांची लढाई लढतोय, हल्ले करून प्रश्न सुटणार आहे का ? उलट यामुळे प्रश्न वाढतील, अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे समाजात दुही वाढेल, त्यामुळे असं कोणीही करू नये, असे आवाहन ही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलंय.
महाराष्ट्राला उध्वस्त करण्याचा विडा सध्याच्या सरकारने उचललाय
महाराष्ट्राला उध्वस्त करण्याचा विडा सध्याच्या सरकारने उचलला आहे. त्यामुळे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणताय आणि तीच लाईन आता फडणवीस यांनी उचलली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारांना हरताळ फासण्याचे काम तुम्ही करताय, मतांच्या ध्रुवीकरणासाठी ही भाषा वापरली जात आहे. यांना हार पुढे दिसत आहे म्हणून योगींना महाराष्ट्रात आणून दंगे घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र यामध्ये ओबीसी तरुणांचा बळी जाईल, गल्ली ते दिल्ली तुमची सत्ता आहे, मात्र तरी तुम्हाला मुस्लिमांची भीती दाखवून मतं मागायची आहे. यामध्येच तुमचा खोटारडेपणा उघड झाला आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलाय.
इतर महत्वाच्या बातम्या