Supriya Sule पुणे : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. महायुतीला तब्बल 220 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 पर्यंतचा आकडा गाठता आला. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना 29 चा देखील आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे तीनही पक्षांपैकी एकही पक्ष विरोधी पक्षनेता पदासाठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे राज्यात विरोधी पक्षनेता पद असेल का नाही अशा शंका व्यक्त केली जात असताना राज्यातील सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षनेता पद द्यायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केली आहे. 


सरकार स्थापन करायला एवढा उशीर लागणे हे दुर्दैव- सुप्रिया सुळे


काँग्रेस पक्षाने 1980 मध्ये विरोधकांच्या कमी जागा असल्यातरी दिलदारपणा दाखवून लीड ऑफ अपोझिशन दाखवला होता. त्यामुळे आताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेता पद द्यायला हवं. मात्र यावर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न आहे. सरकार स्थापन करायला 10 पेक्षा जास्त  दिवस लागले, याचे आश्चर्य वाटतं. सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला जेव्हा की महाराष्ट्राने बहुमत दिलं आहे. सरकार स्थापन करायला एवढा उशीर लागणे हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार मिळायला हवं. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.  


जगातील अनेक देश बॅलेट वर शिफ्ट झाले, आपल्याला अडचण काय? 


ईव्हीएम (EVM) विरोधात राज ठाकरेंच पत्र आले आहे. त्यावर विचार करत असून आम्ही सगळे एकत्र येवून निर्णय घेऊ. तसेच EVM विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात देखील  जाणार आहोत. इंडिया आघाडीची बैठक आणि चर्चा झाली. काँग्रेस पक्ष यावर काम करत आले आहे. या संदर्भात अनेक लोकांकडून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. लोकांच्या मनात अस्वस्थता आहे. लोक प्रतिनिधी म्हणुन आमचं काम आहे हा आवाज ऐकुण घेणं. सोमवारी याबाबतीत आम्ही निर्णय घेऊ असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. निवडणूक आयोगाला एवढीच मागणी आहे की समाजात एवढी अस्वस्थता असेल तर एवढीच मागणी आहे की मागणी मान्य करावी. जगातील अनेक देश बॅलेट वर शिफ्ट झाले आहेत. निवडणुका पारदर्शक व्हायला पाहिजे. बॅलेटवर या निवडणुका घ्या त्यात  कुठलीही अडचण होणार नाही. जगात बदल होत असेल तर आपण देखील करायला हवं. असेही त्या म्हणाल्या. 


आणखी वाचा


मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!


विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा... अजित पवारांची मविआच्या नेत्यांना वॉर्निंग