एक्स्प्लोर

भाजप उमेदवार, अभिनेता सनी देओल प्रचारादरम्यान अपघातातून थोडक्यात बचावला

दिवंगत अभिनेते विनोद खन्ना गुरदासपूरमधून भाजपकडून चार वेळा खासदार राहिले होते. मात्र एप्रिल 2017 मध्ये त्यांचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर ही जागा भाजपच्या हातून निसटली.

अमृतसर : भाजप उमेदवार, अभिनेता सनी देओल सोमवारी एका अपघातातून थोडक्यात बचावला आहे. अमृतसर-गुरदासपूर राष्ट्रीय राज्यमार्गावरुन प्रवासादरम्यान गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल आपल्या ताफ्यासह या मार्गावरून रोड शोसाठी जात होता. दरम्यान सनीच्या गाडीचा टायर फुटल्याने ताफ्यातील कमीत कमी चार गाड्या एकमेकांवर आदळल्या. या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र काही वेळ घटनास्थळी गोंधळ उडाला होता. अपघातानंतर सनी देओल दुसऱ्या वाहनाने पुढील दौऱ्यासाठी निघाला.

सनी देओलने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सनीला भाजपने पंजाबच्या गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सनी देओलचा सामना काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील जाखड यांच्याशी होणार आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना या जागेवर भाजपकडून चार वेळा खासदार राहिले होते. मात्र एप्रिल 2017 मध्ये त्यांचं कॅन्सरने निधन झाल्यानंतर ही जागा भाजपच्या हातून निसटली.

सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती

पंजाबच्या गुरदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिज्ञापत्रात सनी देओलने त्याची मालमत्ता जाहीर केली आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्याच्या बँक खात्यात 35 लाख रुपयांची रोकड आहे. सनीची पत्नी पूजा देओल यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 19 लाख आणि 16 लाख रुपयांची रोकड आहे.

पंजाबमध्ये 19 मे रोजी मतदान

पंजाबमधील लोकसभेच्या सर्व 13 जागांवार शेवटच्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता पंजाबवर लक्ष केंद्रीत केलं आहे. भाजप पंजाबमध्ये मित्रपक्ष अकाली दलसोबत मिळून प्रचार करत आहे.

आणखी वाचा 

VIDEO | रोड शो दरम्यान सनी देओलला महिलेचं किस

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO

Embed widget