एक्स्प्लोर

Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'

Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत.

Sunetra Pawar Baramati Victory: बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ इतकी मते मिळाली. बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला आहे, विक्रमी मतांनी सुनेत्रा पवारांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक (Sunetra Pawar Baramati Victory) बिनविरोध  करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, २२ उमेदवारांनी माघार न घेतल्याने मतदान घ्यावे लागले. या निकालाची औपचारिकता बाकी होती. कार्यकर्ते, पार्थ पवार आणि जय पवारांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवारांना विक्रमी मते मिळाली आहेत. या विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले आहेत.(Sunetra Pawar Baramati Victory)

Sunetra Pawar Baramati Victory: मन खरं तर खूप भरून येत आहे. पण....

सुनेत्रा पवार बोलताना म्हणाल्या, दादांनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. मला कधीही वाटलं नव्हतं की मला अशा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, मन खरं तर खूप भरून येत आहे. पण आज बारामतीकरांनी जो दादांवरती विश्वास दाखवला आहे, प्रत्येक बारामतीकरांनी दादांनी केलेल्या विकासकामावरचं प्रतिक म्हणून आज त्यांना भावांजली वाहिलेली आहे असं मी म्हणेन, बारामतीकरांनी दिलेलं मतदान हे दादांवरील विश्वास त्यांनी आजवर केलेली कामे, सेवा आणि जनतेवरचं प्रेम हे जनतेने त्यांच्या मतातून मला दिलं असं मी मानते आहे.

बारामतीकरांनी जे मतदान केलं आहे, त्यावरून अजित दादांवरचा अढळ विश्वास त्यांनी देखील माझ्या पाठीमागे अढळपणे उभा केला आहे, असं चित्र आहे. दादांना आदरांजली वाहतानाच माझ्यावरचा विश्वास त्यांनी दाखवला आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते, माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, बारामतीकरांना दादांनी जी विकास कामांची स्वप्ने दाखवली ती पूर्ण करण्याचा विश्वास बारामतीकरांना वाटतोय ते त्यांनी मताद्वारे दाखवले आहे. ती कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, असंही पुढे सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे.

Sunetra Pawar Baramati Victory: सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी 

 २४ च्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, जय पवार आणि पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवारांना विक्रमी मतांनी निवडणून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याचबरोबर सर्व पक्षांनी आणि संघटनांनी देखील सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला होता, तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या एकाही उमेदवारांला शंभर मते देखील पडली नसल्याचं दिसून येत आहे. 

बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.

Sunetra Pawar Baramati Bypoll Election: सुनेत्रा पवारांनी सुनील कुमार शर्मांचा विक्रम मोडला

बारामती पोट निवडणुकीतील सर्व मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे, असं सांगितलं जात आहेत.

तर सुनेत्रा पवारांना मिळालेल्या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की, आज रेकॉर्ड मताने निवडून आलो त्यांचे आभार. निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे वाटले नव्हते. आम्हाला कुणालाही वाटत नाही आज आनंदाचा दिवस आहे. कुणीही जल्लोष करू नये. 2029 ची तयारी नाही. मी इथे लोकांसाठी असेल, जनता दरबार घेईल. आचारसंहिता संपल्यावर मी जनता दरबार घेईल, अशी माहिती देखील पार्थ पवारांनी दिली आहे. 

Election: भारतातील सर्वाधिक मताधिक्य असलेले काही प्रमुख आमदार

सुनील कुमार शर्मा — साहिबाबाद (उत्तर प्रदेश) — २,१४,८३४ — २०२२
पंकज सिंह — नोएडा (उत्तर प्रदेश) — १,८१,५१३ — २०२२
अजित पवार — बारामती (महाराष्ट्र) — १,६५,२६५ — २०१९
काशीराम पावरा — शिरपूर (महाराष्ट्र) — १,४५,४४४ — २०१४

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget