एक्स्प्लोर

मतदान जनजागृतीसाठी व्यावसायिक सरसावले, मतदान केल्यानंतर विविध ऑफर्सचा धमाका

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थाकडून देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शक्कल लढवली आहे.

मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. यंदा नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहण्यास मिळत आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीने  मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाबरोबरच आता हॉटेल व्यावसायिक, विविध सामाजिक संस्थाकडून देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी  शक्कल लढवली आहे. मतदान करा आणि सूट मिळवा किंवा मोफत घ्या अशा विविध प्रकारच्या ऑफर अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. अशीच वेगळी ऑफर सध्या पैठणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवले शहरात दिली आहे. ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला करु मतदान...मतदान करा आणि पैठणीवर विशेष सूट मिळवा’ अशी ऑफर  येवला शहरातील कापसे पैठणीतर्फे देण्यात आली आहे.  उद्या मतदान करून जे लोक पैठणी खरेदी करण्यास येतील त्यांना पैठणी खरेदी केल्यावर  15 टक्के सूट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही सूट 21 ते 24  तारखेपर्यंत म्हणजे मतमोजणीच्या दिवसापर्यंत ठेवण्यात आली आहे. Discount on voting | मतदान केल्यास 50 टक्के सूट, दाढी आणि कटिंगवर सूट | नाशिक | ABP Majha कोल्हापुरातील लक्ष्मी मिसळच्या मालकांनी ‘मतदान केल्याची शाई दाखवा आणि 10 टक्के सूट मिळवा तर मतदान करा’ अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याचं नियोजन केलं आहे. कोल्हापूर हा नेहमीचं सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये आणखी भर पडावी यासाठी हा प्रयत्न असल्याचं लक्ष्मी मिसळच्या मालकांनी सांगितलं आहे. नागपूर जिल्हा प्रशासनानं यावर एक अनोखी ऑफर दिलीये. मतदान करा आणि पेंच व्याघ्र प्रकल्प असलेल्या क्षेत्रातील रिसॉर्ट-हॉटेल्समध्ये सूट मिळवा, अशी ऑफर दिली आहे. बोटावर मतदान केल्याचं निशाण दाखवल्यावरच १० ते २५ टक्क्यांपर्यंत ही सूट मिळेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नाशिकच्या रामवाडी परिसरातील प्रभाकर सैंदाणे या सलून व्यावसायिकाने देखील 'मतदान करा आणि ५० टक्के सूट मिळवा' असे आवाहन नागरिकांना केले आहे. बोटाची शाई दाखवल्यावर 2  दिवस  कटिंग आणि दाढीवर ही सूट देणार आहे. दुकानाबाहेर त्यांनी तसे फलक लावले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget