एक्स्प्लोर

UP Election Result : अखिलेश यादव यांनी 'करहल'चा गड राखला; 61 हजार मतांनी दणदणीत विजय

UP Election Result : अखिलेश यादव यांनी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून भाजपच्या एसपी बघेल यांचा पराभव केला आहे. 

UP Election Result : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी 61 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून, करहलमधून (Karhal) हा विजय मिळवला असून भाजपचे केंद्रीय मंत्री असलेल्या एसपी सिंह बघेल यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलेलं होतं. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा कोणत्याही परिस्थितीत पराभव करायचा या उद्देशाने भाजपने कंबर कसली होती. त्यामुळेच त्यांनी करहल मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री एसपी सिंह बघेल यांना उमेदवारी दिली होती. पण सुरुवातीपासूनच अखिलेश यादव आघाडीवर राहिले. भाजपला शेवटपर्यंत ही आघाडी मोडता आली नाही. आता अखिलेश यादव 61 हजार मतांनी विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा 'योगी राज'
उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. आतापर्यंत भाजप 270 ठिकाणी आघाडीवर तर समाजवादी पक्षाला 128 जागांवर समाधान मानावं लागलंय. बसपा  तिसऱ्या स्थानी तर काँग्रेस चौथ्या स्थानी पोहोचलं आहे. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी भाजपच्या जागा जरी घटल्या असल्या तरी उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखली आहे.

निवडणूक प्रचार रॅलीमध्ये अखिलेश यादव यांनी पूर्ण आत्मविश्वासाने दावा केला की, सपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करणार. सुरुवातीला त्यांनी 400 पारचा नाराही दिला होता. मात्र नंतर त्यांनी 300 पारचा नारा दिला. अखिलेश यादव यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी होत होती. सपाचा जाहीरनामाही खूप चर्चेत होता. भाजप आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावर निशाणा साधण्यातही त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आता त्यांचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. मात्र सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून मोठी आघाडी कायम ठेवली आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?

व्हिडीओ

Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget