Malvika Sood : अभिनेता सोनू सूदची (Sonu Sood) बहीण मालविका सूद सच्चरदेखील (Malvika Sood Sachar) निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. मालविका पंजाबमधील मोगा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मालविका सूद सच्चर यांनी जनतेला निवडून आल्यास सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा सुधारू, मोगा येथे रोजगाराच्या संधी निर्माण करू, प्रत्येक सरकारी शाळेत शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी शिक्षकांची संख्या वाढवू, गृहिणींचे कर्ज माफ करू अशी अनेक आश्वासने दिली आहेत. 


मालविकाकडे किती संपत्ती आहे, जाणून घ्या?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मालविकांकडे तब्बल 86,31,935 रुपयांची संपत्ती आहे. यात 10 लाखाच्या Kia Seltos कारचा आणि तीस तोळे सोन्याचादेखील समावेश आहे. तर 1,09,00,000 किमतीची तिच्याकडे मालमत्ता आहे. 


38 वर्षीय मालविका सूद या अभिनेता सोनू सूदची सर्वांत लहान बहीण आहे. मालविकाने संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून त्या मोगा येथे इंग्रजी कोचिंक सेंटर चालवतात. यासोबतच त्यांनी मोगा येथे शिक्षण, रोजगार आणि आरोग्य क्षेत्रात काम केले आहे.


मालविकाचे वडील शक्ती सागर सूद यांचे 2016 मध्ये आणि आई सरोजबाला सूद यांचे 2007 मध्ये निधन झाले. आई-वडिलांच्या स्मरणार्थ भावंडांनी सूद चॅरिटी फाउंडेशनची स्थापना केली. सोनूच्या वडिलांचे मोगा येथे बॉम्बे क्लॉथ हाऊस नावाचे कपड्यांचे दुकान होते. तसेच आई सरोजबाला सूद डीएम कॉलेज, मोगा येथे इंग्रजी शिकवायच्या.


पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान –
117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.


संबंधित बातम्या


Punjab Result AAP : लाडूसाठी ऑर्डर, सेलिब्रेशन सुरु, पंजाबमध्ये 'आप' धुरळा उडवणार?


Election Results 2022: निकालाचा काऊंटडाऊन सुरु, मॅजिक फिगर गाठण्यासाठी धडपड, पाहा कोणत्या राज्यात किती जागा?


UP Election 2022: दुर्बिणीने EVM वर लक्ष ठेवत आहेत समाजवादी पक्षाचे उमेदवार, जाणून घ्या काय आहे कारण


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha