The Kashmir Files : बहुचर्चित  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर सिनेमा येत्या शुक्रवारी म्हणजेच 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची दुसरी झलक खूपच दमदार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. 


काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर होणारे अत्याचार आणि आजच्या तरुणांच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाची कथा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सिनेमाचा दुसरा ट्रेलर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो. 


 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. 1989 आणि 1990 सालातील काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा सिनेमा भाष्य करतो. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.





एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशी म्हणाली,"हे पात्र साकारणे खूप आव्हानात्मक होते. या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे". 


ट्रेलर पाहा :



संबंधित बातम्या


Historical Upcoming Movies : 'पावनखिंड'नंतर 'हे' ऐतिहासिक सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी'चा बॉक्सऑफिसवर धमाका, 100 कोटींचा आकडा पार