Smita Patil on Ajit Pawar, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली येथे बुधवारी (दि.30) झालेल्या सभेत महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि दिवंगत नेते आर आर पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. "70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर. आर. पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झालं. परंतु माझ्या त्या फाईलवर सहीवर राज्यपालांनी सही केली नाही. सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली", असं अजित पवार म्हणाले. शिवाय आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता. त्यानंतर आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी दु:ख देखील व्यक्त केलं होतं. मात्र, आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी अजित पवार यांना महत्त्वपूर्व आवाहन केलं आहे.
स्मिता पाटील काय काय म्हणाल्या?
अजित दादांमध्ये आम्ही आमच्या आर आर आबांना पाहतो. अशावेळी आबा हयात नसताना वडीलधाऱ्या दादांनी केलेल्या वक्तव्यामुळं अतीव दुःख झालं. असं म्हणत आबांची कन्या स्मिता पाटलांनी वडीलधाऱ्या अजित पवार यांच्याकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. दादांनी आमचं पालकत्व स्वीकारल्यानं ते आम्हाला आबांसारखे आहेत. त्यामुळं ते असं वक्तव्य करतील याचा आम्ही कधीचं विचार केला नव्हता. मात्र वडीलधाऱ्या दादांचा यामागे काय हेतू होता, हे मी त्यांना मुळीच विचारू शकत नाही.
आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी
पण यापुढं ते त्यांच्या मुला समान असणाऱ्या रोहित पाटलांच्या विरोधात तासगावमध्ये येऊन जेव्हा प्रचार करतील, त्यावेळी त्यांनी आरोप-प्रत्यारोप नक्कीचं करावेत. पण त्या आरोपांचं खंडन करणारी व्यक्ती हयात आहे की नाही, याची खबरदारी घ्यावी आणि त्यासोबतचं तथ्य असणारेचं आरोप त्यांनी करावेत, अशी विनंती स्मिता पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra Vidhansabha Election : मैत्रीपूर्ण लढत, बंडखोरी ते आयात उमेदवार,महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळात गोंधळ; संपूर्ण माहिती एका क्लिकवर