Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्रात राजकारणात गेल्या 5 वर्षात अनेक मोठी वळण पाहायला मिळाली आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक नेते भाजप आणि महायुतीतील घटक पक्षात प्रवेश करत होते. मात्र, 2019  पेक्षा 2024 विधानसभा निवडणुकीत सर्वांना गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे. शिंदेंची शिवसेना, दादांची राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रितपणे लढत असली तरी त्यांनी एकमेकांच्या उमेदवारांविरोधात नवे चेहरे मैदानात उतरवले आहेत. त्याला काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती असा शब्द वापरला जातोय. या शिवाय जागा वाटपाच्या अॅडजेस्टमेंटमध्ये काही भाजप नेत्यांनी शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय. त्यामुळे कोणता नेता कोणता पक्षात आहे. याचा मेळ लागत नाहीये. महाविकास आघाडीतही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी देखील एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत. याशिवाय विशेष म्हणजे प्रत्येक पक्षात रातोरात प्रवेश देऊन अनेकांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. 


महायुतीमधील मैत्रिपूर्ण लढती 


विदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघ आहे. ज्या ठिकाणी भाजपने उमेश उर्फ चंदू यावलकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. 


अणूशक्तीनगर शिंदे गट – अजित पवार गट यांच्यामध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. अजित पवारांकडून सना मलिक तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 
अविनाश राणेंना उमेदवारी देण्यात आली आहे. राणेंना शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आला


आष्टी विधानसभा मतदारसंघात देखील महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी..


शिवाजी नगर - मानखुर्दमध्ये देखील मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक - शिवसेनेकडून बुलेट पाटील


खडकवासल्यातही मैत्रिपूर्ण लढत - भाजपकडून विद्यमान आमदार भीमराव तापकीर, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्तात्रय धनकवडे


दौंडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी- विरधवल जगदाळे, भाजप- राहुल कुल


पुरंदर- शिवसेना शिंदे- विजय शिवतारे, अजित पवार राष्ट्रवादी- सनदी अधिकारी  संभाजी झेंडे


नाशिक- दिंडोरी- अजित पवार राष्ट्रवादी- नरहरी झिरवाळ, शिवसेना शिंदे- धनराज महाले


नाशिक- देवळाली- अजित पवार राष्ट्रवादी- सरोज अहिरे, शिवसेना शिंदे- राजश्री अहिरराव


महाविकास आघाडीतील मैत्रिपूर्ण लढती 


महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी  अर्ज भरले आहेत


मिरज -


शिवसेना ठाकरे गट -तानाजी सातपुते
काँग्रेस - मोहन वनखंडे


सांगोला -


शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे  
शेकाप - बाबासाहेब देशमुख


दक्षिण सोलापूर


काँग्रेस - दिलीप माने
शिवसेना ठाकरे गट - अमर पाटील


पंढरपूर


काँग्रेस भागीरथ भालके
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अनिल सावंत


परांडा


शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील  
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे


दिग्रस


शिवसेना ठाकरे गट  - पवन जैस्वाल
काँग्रेस -माणिकराव ठाकरे


नांदेड- 


काँग्रेस- अब्दुल सत्तार
शिवसेना उबाठा- संगिता पाटील डक



महाराष्ट्रात बंडखोरी झालेले मतदारसंघ 



विदर्भ-बंडखोरी
-------------


अमरावती- बडनेरा मतदारसंघ- भाजपचे तुषार भारतीय अपक्ष अर्ज वि. रवी राणा - भाजपचा पाठिंबा


दर्यापूर - काँग्रेसचे गुणवंत देवपारे महाविकास आघाडी विरोधात आज बंडखोरी,भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले महायुती विरोधात बंडखोरी


यवतमाळ- उमरखेड मतदारसंघात महायुती बंडखोरी, भाजपचे माजी आमदार राजू नजरधने यवतमाळच्या उमरखेड मतदार संघातून मनसेकडून उमेदवारी


नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बंडखोरी-राजश्री जिचकार यांनी देखील काटोलमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला


उत्तर नागपूर मतदारसंघातून काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या विरोधात जेष्ठ नगरसेवक मनोज सांगोले यांनी बंडखोरी केली


पश्चिम नागपूर मधून विकास ठाकरे विरोधात काँग्रेसचे निलंबित नरेंद्र जिचकार यांनी उमेदवारी अर्ज भरला


बुलढाणा- सिंदखेड राजात महायुतीत बंडखोरी- भाजपा पदाधिकारी अंकुर देशपांडे यांनी दाखल केली अपक्ष उमेदवारी, सिंदखेड राजात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश


भंडारा विधानसभा : भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते चेतक डोंगरे यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली


तुमसर विधानसभा- तुमसर विधानसभेत शरद पवाराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांनी बंडखोरी करीत नामांकन दाखल केला. तुमसर विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष ठाकाचंद मुंगूसमारे यांनी बंडाखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.


साकोली विधानसभा भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी करणारे संघाचे विदेश प्रचारक डॉ सोमदत्त करंजेकर यांनी बंडखोरी करीत त्यांचं नामांकन अर्ज दाखल केला आहे.


नंदुरबार- आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचे लहान बंधू शरद गावित यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी


शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केले आहे


बुलढाणा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी बघायला मिळत आहे याठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनोने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


वाशिम विधानसभा  मतदारसंघ- विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटात  मदन उर्फ राजा भैया पवार यांनी  शिवसेना उबाठा गटाकडून  अधिकृत उमेदवार डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या विरोधात बंडखोरी केली..


वाशिम-  रिसोड मतदारसंघात महायुतीच्या  शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार   भावना गवळी यांच्या विरोधात  बंड करत भाजपचे अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरलाय


वाशिम- कारंजा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे उमेदवार ज्ञायक पाटणी यांच्या विरोधात   बंडखोरी करत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस  देवानंद पवार यांनी  उमेदवारी अर्ज भरलाय


अकोला पश्चिम- राजेश मिश्रा, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि शहर प्रमुख. मिश्रा यांनी बंडखोरी केली असून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय


------------------------------------------
पश्चिम महराष्ट्र- बंडखोरी
----------------
पुणे- वडगाव शेरीतून जगदिश मुळीक अपक्ष अर्ज- सुनील टिंगरेंना अजित पावारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी


सोलापूर दक्षिण विधानसभा - सुभाष देशमुख - भाजप उमेदवार  वि. बंडखोर - सोमनाथ वैद्य (भाजपतून बंडखोरी करत अपक्ष लढणार)


सांगली विधानसभेत काँग्रेस मध्ये तर  शिराळा  आणि जत मध्ये भाजपात बंडखोरी..सांगली विधानसभा मध्ये काँग्रेस कडून पृथ्वीराज पाटील यांना तिकीट मिळाल्याने जयश्रीताई पाटील यांनी नाराज


जतमध्ये भाजपात बंडखोरी... भाजपचे नेते तमनगौडा रवीपाटील लढवणार अपक्ष निवडणूक लढवणार


-----------------------------------


उत्तर महाराष्ट्र- बंडखोरी
--------------------
नंदुरबार -अक्कलकुवा:-विधानसभा मतदार संघात भाजपचे माजी खासदार डॉ हिना गावित यानी बंडख़ोरी केली, ही जागा शिवसेनेला सुटली


नाशिक- चांदवड-  भाजपचे डॉ.राहुल आहेर वि. केदा आहेर


धुळे- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाराज झालेल्या हिलाल माळी यांनी बंडखोरीकर आपल्या पक्षाच्या पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी केली आहे तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा दिल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या श्याम सनेर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली


जळगाव- पारोळा एरंडोल मतदार संघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत यांच्या विरुद्ध भाजपचे माजी खासदार ए.टी नाना पाटील यांनी आज अपक्ष त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील यांनी सुद्धा आज त्यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला


अहिल्यानगर (दक्षिण) जिल्हा- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल),
शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघ- चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी अजित पवार गट)(अपक्ष अर्ज दाखल)


नाशिक-  नांदगाव विधानसभा मतदारसंघात  छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्यां विरोधात बंडखोरी करत नांदगाव विधानसभा मतदारसंघात बंडखोरी केली आहे.


इगतपुरी मतदार संघात महाविकास आघाडीने लकी जाधव यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसच्या माजी आमदार आणि सध्याच्या शिवसेना नेत्या निर्मला गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली.


महायुतीकडून हिरामण खोसकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते काशिनाथ मेंगाळ यांनी बंडखोरी करत मनसेत प्रवेश करून खोसकर यांना आव्हान दिले आहे.


नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत गीते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज भरला


मालेगाव बाह्य मतदारसंघातून भाजपचे युवा प्रदेश सचिव कुणाल सुर्यवंशी यांनी महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्या विरोधात बंडखोरी केली...
मालेगाव मध्य मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या शान ए हिंद निहाल अहमद यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार एजाज बेग, अजीज बेग यांच्या विरोधात बंडखोरी केली...


शिंदखेडा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे श्याम सनेर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला


शिरपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली आहे


श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी राहुल जगताप (राष्ट्रवादी शरद पवार गट) (अपक्ष अर्ज दाखल)


--------------------------------------
कोकण- बंडखोरी
--------------------
सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी, भाजपचे प्रदेश युवा उपाध्यक्ष विशाल परब यांचा सावंतवाडीतून अपक्ष उमेदवार अर्ज दाखल.शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात महायुतीत बंडखोरी


सिंधुदुर्ग- भाजप मधून विशाल परब यांनी बंडखोरी करत अपक्ष तर शरद पवार राष्ट्रवादी मधून अर्चना घारे परब यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला


रत्नागिरी- गुहागर- भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांची बंडखोरी...


रत्नागिरी संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघ भाजपाचे माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी बंडखोरी करत शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. महायुतीकडून उदय सामंत यांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता ही लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात धनुष्यबाण आणि मशाल यांच्यात होणार आहे
-------------------------------


मराठवाडा- बंडखोरी
------------------------
बीड- पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, आष्टी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे  आमदार बाळासाहेब आजबे यांच्या ऐवजी या ठिकाणी भाजपला ही जागा सोडण्यात आली आणि भाजपकडून सुरेश धस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे..


पक्षाकडून डावलण्यात आल्यानंतर बाळासाहेब आजबे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला


हिंगोली- हिंगोली विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी रूपाली पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर यांनी  अपक्ष उमेदवारी भरली आहे आघाडीमध्ये  परंपरागत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असतो


वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत बंडखोरी पाहायला मिळत आहे चंद्रकांत नवघरे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीकडून उमेदवारी दिली असताना शिवसेनेचे राजू चापके भाजपच्या उज्वला तांबाळे आणि भाजपचे नेते मिलिंद यंबल यांनी अपक्ष उमेदवारी भरली
------------------------------


मुंबई- नवी मुंबई- बंडखोरी
----------------------------
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ- शिंदे गटात बंडखोरी- स्वीकृति शर्मा वि. मुरजी पटेल


मुंबई- महायुतीत वांद्रे पूर्वे विधानसभेत बंडखोरी  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी देण्यात आली  माञ शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर अपक्ष लढणार


नवी मुंबई - बेलापुर विधानसभेत महाविकास आघाडीत बंडखोरी. संदीप नाईक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने मंगेश आमले भरणार अपक्ष अर्ज


-------------------------------------------------------


मोठ्या आयारामांना संधी


मुंबई- वांद्रे- भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार श्रीमती तृप्ती सावंत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आणि आज त्यांना वांद्रे पूर्व मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी जाहीर


डॉ. राजेंद्र शिंगणे - शरद पवार गटात प्रवेश


मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची तिकीट कापली व त्यांच्या जागी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादीमध्ये घेत त्यांना उमेदवारी देण्यात आली...


सिंधुदुर्ग- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात भाजप मधून राजन तेली हे आयत्यावेळी येऊन उमेदवारी मिळाली.


धुळे- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल गोटे यांना आयात करून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले


भंडारा- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची लढत भाजपचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून आयात केलेले अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी लढत


बेलापुर विधानसभेत-  संदीप नाईक- शरद पवार पक्षाकडून उमेदवारी


चिंचवड- चिंचवड पोटनिवडणुकीला बंडखोरीचा पडलेला शिक्का पुसून काढण्यात अखेर राहुल कलाटेंना यश आलंय. शरद पवारांनी त्यांना यंदा संधी दिल्याने ते तुतारी फुंकत चिंचवडच्या मैदानात उतरलेत


बोरीवलीतून संजय उपाध्याय यांना भाजपनं उमेदवारी दिल्यानंतर नाराजी, गोपाळ शेट्टी नाराज


अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश ब्राह्मणकर यांचा भाजपात प्रवेश, भंडाऱ्याच्या साकोलीतून भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी घोषित


शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसची उमेदवारी घेतली आहे...


बुलढाणा- जिल्ह्यात तीन मोठ्या अयारामाना संधी मिळाली, सिंदखेड राजा मतदार संघात अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले डॉ.राजेंद्र शिंगणे , बुलढाणा मतदार संघात काँग्रेस मधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आलेल्या जयश्री शेळके तर मेहकर मतदार संघात निवडणुकीच्या तोंडावर उद्धव सेनेत प्रवेश केलेले सिद्धार्थ खरात, या तिघांना उमेदवारी मिळाली


सोलापूर दक्षिण विधानसभा- बंडखोर - महादेव कोगणुरे ( काँग्रेसमधून बंडखोरी करत मनसेतून उमेदवार), संतोष पवार ( महाविकास आघाडीतून इच्छुक आता वंचित आघाडीतून उमेदवार), मौलाली सय्यद (काँग्रेसमधून बंडखोरी करत प्रहार पक्षातून उमेदवार)


श्रीगोंदा विधानसभा- राष्ट्रवादी (AP) मधून आलेल्या अनुराधा नागवडे यांना शिवसेना ठाकरे गटाने दिली उमेदवारी


वाशिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ प्रमुख डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना शिवसेनेच्या उबाठा गटाकडून उमेदवारी


कारंजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सई डहाके यांना भाजपकडून तिकीट मिळाला आहे तर याच मतदारसंघात भाजपचे ज्ञायक पाटणी यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळाली
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युसूफ पुंजानी यांना  एम आय एम  पक्षाने  पक्षाने उमेदवारी दिली आहे


नांदेड- मिनल खतगावकर संगीता पाटील ढक,  श्रीजया चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर


गोंदिया- तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले गोपाल अग्रवाल 2019 मध्ये भाजपात गेले होते... त्यानंतर 2024 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी केली व त्यांना आता काँग्रेस कडून गोंदिया विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.


गोंदिया- भाजपचे माजी मंत्री यांनी राजकुमार बडोले यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला व त्यांना राष्ट्रवादीने मोरगाव अर्जुन विधानसभेची उमेदवारी दिली


चंद्रपूर- किशोर जोरगेवार (अपक्ष आमदार) भाजपकडून संधी


सोलापूर- राजेंद्र राऊत (अपक्ष असताना शिंदे गटात प्रवेश आणि बार्शीसाठी उमेदवारी)
 
सोलापूर- ⁠मीनल साठे (काँग्रेसच्या माजी नगरध्यक्ष, महाविकास आघाडीकडून इच्छुक पण राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी)


प्रतापराव चिखलीकर- लोहा कंधार - अजित पवार गट


झिशान सिद्धकी- वांद्रे पूर्व- अजित पवार गट


माऊली कटके- शिरूर हवेली- अजित पवार गट


सना मलिक- अणुशक्तीनगर- अजित पवार राष्ट्रवादी


तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघात भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील  महायुतीच्या अजित पवार गटात प्रवेश करून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार


इस्लामरामपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अजित पवार गटात गटाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार


नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदार संघात शिंदे समर्थक मात्र अडीच वर्ष अपक्ष असलेल्या आमदार आशिष जयस्वाल यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत विधिवत प्रवेश केलं आणि प्रवेशाच्या मंचावरच मुख्यमंत्र्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली  


वैजापूर मतदार संघात भाजपातून आलेल्या दिनेश परदेशींना उद्धव ठाकरे घटना संधी दिली.
औरंगाबाद पश्चिम मधून भाजपमधून आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी दिली.


शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवार गटातून आलेल्या सतीश चव्हाण यांना गंगापूर मधून उमेदवारी दिली.


रावसाहेब दानवे यांची मुलगी असलेल्या संजना जाधव यांनी ज्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला त्याच दिवशी त्यांना उमेदवारी दिली.
सिल्लोड मतदारसंघात भाजपमधून आलेल्या सुरेश बनकर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली.


नाशिक पूर्व:-
भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या गणेश गिते यांना संधी


नंदुरबार- काँग्रेस ने निवडणुकीच्या तोंडावर भजपातुन आलेल्या राजेंद्र गावित याना शहादा तलोदा मतदार संघातुन उमेदवारी दिली आह


------------------------------------------------------------


आयत्यावेळी बदलेले उमेदवार



जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुका मतदार संघात उद्धव ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी उमेदवारी मधे बदल करत राजू तडवी यांच्या एवजी प्रभाकर सोनावणे यांना उमेदवारी दिली


सोलापूर- सिद्धी कदम (मोहोळमध्ये शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर करून रद्द केली), राजू खरे (मोहोळमध्ये शरद पवार गटाने सिद्धी कदम यांना रद्द करून उमेदवारी दिली)


गोंदिया- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे यांना बदलून राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे..


काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा उमेदवार बदलला, राजू लाटकर यांच्या जागी मधुरिमाराजे यांना उमेदवारी



6. विद्यमान आमदार ज्यांना पुन्हा संधी नाही


बीड जिल्ह्यातील विद्यमान आमदाराला डावलून दिली उमेदवारी..गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या ऐवजी महायुती अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांना उमेदवारी
माढा - बबनदादा शिंदे


विद्यमान आमदार ज्यांना पुन्हा संधी नाही
श्रीगोंदा - भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना संधी न देता त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना संधी देण्यात आली.


पालघर- आमदार श्रीनिवास वनगा


वाशिम विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार लखन मलिक यांची उमेदवारी चा पत्ता कट करून यांच्या जागी भाजपचे शाम खोडे यांना  उमेदवारी देण्यात आली


कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपचे  दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पूत्राला उमेदवारी न देता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सई डहाके यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्यात आली


विद्यमान आमदार - श्याम सुंदर शिंदे याना संधी नाही , लोहा कंधार मतदारसंघात राष्ट्रवादी कडुन चिखलीकर तर महाविकास आघाढी कडुन एकनाथ पवार यांना उमेदवारी


गोंदिया- मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी अजीत पवार)


गडचिरोली- भाजपचे विद्यमान आमदार डॉ देवराव होळी यांना डावलून डॉ मिलिंद नारोटी याना संधी


तासगाव कवठेमंकाळचे आमदार सुमनताई पाटील यांच्या ऐवजी यांचे पुत्र रोहित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली


मध्य नागपूरमधील विकास कुंभारेंना पुन्हा संधी नाही


नागपूर- कामठी मधील टेकचंद सावरकरांना पुन्हा संधी नाही


एरंडोल मतदारसंघात चिमण पाटील यांच्या एवजी मुलगा अमोल पाटील,तर
रावेर आ शिरीष चौधरी  यांचा मुलगा धनंजय चौधरी यांना देण्यात आली