Balasahebanchi Shiv Sena 2 Swords and Shield Symbol : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ढाल-तलवार चिन्हावर (2 Swords and Shield Symbol) नांदेडच्या (Nanded) शीख समाजातर्फे आक्षेप घेण्यात आला आहे सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे (Gurudwara Shri Sachkhand Darbar) माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवलं आहे. त्रिशूळ हे धार्मिक चिन्ह असल्याकारणानं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) ते नाकारलं याप्रमाणे ढाल-तलवार हेदेखील खालसा पंथाचं धार्मिक प्रतीक आहे, त्यामुळे हे चिन्ह निवडणूक आयोगानं द्यायला नको होतं. या संदर्भातील निर्णय नाही झाला तर रणजीत सिंह न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. 


ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. तर शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतला आहे. खालसा समाजाच्या धार्मिक प्रतिकाशी हे चिन्ह मिळतं जुळतं असल्यानं त्याचा निवडणूक चिन्ह म्हणून वापर होऊ नये, अशी मागणी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी केली आहे. तसं, निवेदनही त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. .


अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri East Bypoll 2022) ही खऱ्या अर्थानं शिंदेंच्या एन्ट्रीनंतर महत्त्वाची ठरली आहे. शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करत चिन्ह घेतलं. शिंदे गटही अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार उतरवणार असं वाटलं होतं. पण आपल्या हक्काचं मैदान शिंदे गटानं भाजपला दिलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


ठाकरेंना 'मशाल', तर शिंदेंना 'ढाल-तलवार'


निवडणूक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि पक्षाची नावं दिली आहेत. शिवसेना हे नाव वारण्यास दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे. तर, शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाणही गोठवण्यात आलं आहे. यात निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं आहे. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं होतं. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यानंतर शिंदे गटाकडून ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हं देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आलं. 


शिंदे गटाला देण्यात आलेल्या चिन्हामध्ये दोन तलवारी आणि ढाल आहे. तळपता सूर्य हे चिन्ह शिंदे गटानं पहिल्या पसंतीस दिलं होतं. परंतु, निवडणूक आयोगानं हे चिन्ह शिंदे गटाला नाकारलं आहे. कारण उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यामध्ये गोंधळ होऊ शकतो. कारण उगवता सूर्य हे पहिल्यापासूनच डीएमके पक्षाचं चिन्ह आहे. याबरोबरच मिझोराम नॅशनल पक्षाचं देखील उगवता सूर्य हे चिन्ह आहे. त्यामुळे शिंदे गटाला उगवता सूर्य हे चिन्ह नाकारण्यात आलं आहे. पण आता शिंदे गटाला देण्यात आलेल्या ठाल तलवार या चिन्हामुळेही वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.