एक्स्प्लोर

अक्कलकोटमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मांडीला मांडी लावून भोजनावर ताव

निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर टीकेची झोड उठवण्याची एकीकडे परंपरा असताना म्हेत्रे आणि कल्याणशेट्टींच्या या सहभोजनाची चांगलीच चर्चा होत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

सोलापूर : सोलापूरतील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकत्रित बसून जेवण केलं. काँग्रेसचे उमेदवार आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि भाजपचे उमेदवार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोबत भोजन केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील बसवलिंगेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन्ही उमेदवार नागणसुर येथील मठात आले होते. त्यावेळी दोघांनीही शेजारी बसून जेवण केलं. यावेळी दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यात म्हेत्रे आणि कल्याणशेट्टी यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. नागणसूर गावातील मतं ही नेहमीच निर्णायक ठरत असतात त्यामुळे पुण्यतिथीचे निमित्त साधत दोन्ही उमेदवारांनी गावाला भेट दिली आणि मतदारांना मतांची साद घातली. निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर टीकेची झोड उठवण्याची एकीकडे परंपरा असताना म्हेत्रे आणि कल्याणशेट्टींच्या या सहभोजनाची चांगलीच चर्चा होत आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत. अक्कलकोटमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांचा मांडीला मांडी लावून भोजनावर ताव 1997 पासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचं राजकारण हे पूर्णत: सिद्धाराम म्हेत्रेंच्या अवती भवती घुमत आहे. 1997 च्या पोटनिवडणुकीतून म्हेत्रे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2009 ची विधानसभा वगळता त्यांनी अक्कलकोटमधून काँग्रेसला नेतृत्व दिलं. म्हेत्रे यांचा 2009 ला पराभव करणारे भाजपचे सिद्रामप्पा पाटील यांच्यात आडवे विस्तव जात नव्हते. 2014 पर्यंत म्हेत्रे आणि पाटील या दोघांमध्ये मोठी राजकीय खुन्नस होती. 2014 नंतर काही कारणांसाठी सिद्रामप्पा पाटील हे भाजपपासून दुरावले आणि एकमेकांचे राजकीय हाडवैर असलेले म्हेत्रे-पाटील एकत्रित आले. त्यामुळे त्यांच्यासमोर आता कोणाचा निभाव लागणार नाही असे अक्कलकोट तालुक्यात मतदारांचा सूर होता. मात्र याच दरम्यान भाजपतर्फे सचिन कल्याणशेट्टी यांनी संघटनात्मक कार्यावर भर दिला. नगरपरिषदा, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकांत भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाले. या साऱ्याचं श्रेय स्थानिक भाजप नेते सचिन कल्याणशेट्टीला दिलं जातं. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आ. सिद्धाराम म्हेत्रे आणि भाजपाकडून सचिन कल्याणशेट्टी यांच्यात होत असलेली ही लढाई चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे. हे देखील वाचा - अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा
ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरु नका, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला इशारा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘पुणे आरटीए’च्या बैठकीत आदेश, नेमकं काय आहे कारण?
Malegaon Crime News : डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
डोंगराळे खटल्यात फाशीचा निकाल, पण आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नाही, उज्ज्वल निकम म्हणाले 'मुलगी त्याला दादा म्हणायची...'
Who is Manarah Al Nahyan: तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
तब्बल 300 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अबू धाबीच्या सत्ताधारी राजघराण्याची सून लंडनरच्या रस्त्यावर बेशुद्ध सापडली, कोर्टाची जबरी शिक्षा, नेमकं घडलं तरी काय?
Pradeep Purnekar Thane Crime: प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
प्रदीप पूर्णेकरांना मारण्यासाठी पप्या शिंदे पायात चप्पलेऐवजी बूट घालून का आला? समोर आलं मोठं कारण
Reliance Industries on Elon Musk: मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
मस्क यांच्या सनसनाटी आरोपांवर पहिल्यांदाच रिलायन्सकडून पहिल्यांदाच निवेदन; 'आम्ही स्पर्धेला कधीच घाबरत नाही, त्यामुळे स्टारलिंकचे..'
Nashik News: आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
आदिवासी संस्कृतीचा जागतिक मंचावर मोठा सन्मान; 'शबरी नॅचरल्स'च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा 'ग्लोबल गुड डिझाईन अवॉर्ड' जाहीर
Pune Crime News: चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
चॅंटिंग अन् पेमेंट स्क्रिनशॉट, खोट्या गुन्ह्यात अडकलण्याची धमकी, वारंवार फोन, पुण्यात 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलेल्या आयटी इंजिनिअरच्या लॅपटॉपमध्ये काय-काय सापडलं?
Rajnath Singh: ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
ही लढाई ज्ञानेशकुमारांविरोधात नाही, यांना सरकार पाडायचंय; राजनाथ सिंहांचा त्या वक्तव्यावर संताप, म्हणाले, 'सत्तापालट सारख्या शब्दांच्या वापरावरून स्पष्ट होतं की..'
Embed widget