एक्स्प्लोर

गडी एकटा निघाला...!, शरद पवारांना उद्देशून श्रीनिवास पाटील यांचं भावनिक गाणं

"ना सखा, ना सोबती, तरी ना हा नाही थांबला...गडी एकटा निघाला....!" असे या गाण्याचे शब्द असून ते शरद पवार यांना उद्देशून आहेत. श्रीनिवास यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत गर्भगळीत झालेल्या राष्ट्रवादी पक्षाला आजही 79 वर्षाच्या शरद पवारांच्याच नेतृत्वाची गरज असल्याचं चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत पडलेलं भगदाड विधानसभा निवडणुकीतही अधिक मोठं झालं. अनेकांनी पक्षाला रामराम करुन भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत ही जागा राखण्याचं मोठं आव्हान पक्षासमोर आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांसाठीचं एक भावनिक गाणं सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी  शेअर केलं आहे. साहिल विधाते यांनी या गाण्याची निर्मिती केली असून गायक राहुल वैद्यने हे गाणं गायलं आहे. "ना सखा, ना सोबती, तरी ना हा नाही थांबला...गडी एकटा निघाला....!" असे या गाण्याचे शब्द असून ते शरद पवार यांना उद्देशून आहेत. श्रीनिवास यांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या गाण्यात शरद पवार यांनी राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर निभावलेली विविध पदं, नेते, कलाकार यांच्याबरोबरचे फोटो वापरले आहेत. विशेषतः शरद पवार संरक्षणमंत्री असताना त्यांनी सैनिकांबरोबर घालवलेला वेळ, सियाचीनची सफर हे फोटोही या गाण्यात वापरले आहेत. सातारा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पवारांची संरक्षणमंत्री म्हणून त्यांची जुनी ओळख या व्हिडीओमधून मांडण्यात आली आहे. तसंच या गाण्यात सत्तेच्या मोहापायी काही साप पळून गेल्याची ओळ आहे. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या उदयनराजे यांचं नाव न घेता टीका केली आहे. तसंच श्रीनिवास पाटील यांनी शरद पवार आणि त्यांच्या साठ वर्षांच्या मैत्रीची आठवणही शेअर केली आहे. त्यासाठी 'शोले'मधील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' गाणं वापरण्यात आलं आहे. एकूणच या निवडणुकीत 79 वर्षांचे शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख चेहरा ठरले आहेत. गेली अनेक वर्षे राज्यातील राजकारणावर पकड असलेले शरद पवार किती संघर्ष करत आहेत, हे गाण्यातून दाखवून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
Legislative Council Elections : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी बिगुल वाजणार! पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
Vivek Oberoi Shares Post On Sunetra Pawar: 'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
'सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो...'; विवेक ओबेरॉयची सुनेत्रा पवार यांच्यासाठी मराठीतून पोस्ट
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Khan Sir On Paper Leak : मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
मुलांचे 10 रुपयाचे डायपर लीक होत नाही, यांचा NEET पेपर लीक होतो; खान सर NTA वर संतापले
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात; मोदींचे आवाहन, जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरुन हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Embed widget