एक्स्प्लोर

राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस पाठवल्याबद्दल मला विशेष वाटत नाही. या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. तर या प्रकरणात काळंबेरं असू शकेल, पण पूर्ण माहितीशिवाय बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिली आहे. तपास यंत्रणांना निष्पक्षपाती काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे : राऊत संजय राऊत म्हणाले की, "मी सुद्धा अनेक वेळा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. मलाही नोटीस यायला हवी होती. या देशात लोकशाही आहे. जर मी चुकीची गोष्ट केली नसेल तर मी ते सिद्ध करु शकतो. आपल्या तपास यंत्रणेवर चांगले संस्कार आहेत. या यंत्रणांना निष्पक्षपाती काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मी अनेकांची चौकशी होताना पाहिलं आहे, त्यामुळे मला याबद्दल (राज ठाकरेंच्या नोटीसबाबत) काही विशेष वाटत नाही." काळंबेरं असू शकेल, पण पूर्ण माहितीशिवाय बोलणं योग्य नाही : मनोहर जोशी राज ठाकरेंना ईडीने नोटीस पाठवल्याचं विशेष वाटत नाही : संजय राऊत तर या प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. याविषयी मनोहर जोशी यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "मला याबाबतची बातमी वाचावी लागेल, त्याशिवाय काही बोलणं योग्य नाही. माझी उन्मेषशी भेटच झालेली नाही. यामागे काही कळंबेरं असू शकेल, पण याबाबत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय काही बोलणं मी योग्य मानत नाही. तुम्ही ज्यावेळीस बिझनेसमध्ये उतरता त्यावेळी अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. मी पाहत असताना या संस्थेत असे गैरप्रकार झाले नव्हते, यावेळी अशी बातमी प्रथमच येत आहे. याबाबत विचारपूर्वक उत्तर देऊ. वाटलंच तर मुख्यमंत्र्यांना भेटेन." राज ठाकरे यांना ईडीची नोटीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. कर नाही त्याला डर कशाला? राज ठाकरेंना ईडीच्या नोटीसनंतर मनसे आक्रमक काय आहे प्रकरण? काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत घेतली. उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते. उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिलं होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा व्यवहार संशयास्पद असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Waze : दिशा सालियन प्रकरणात महत्वाची अपडेट, वकील निलेश ओझाकडून बदनामी सुरु असल्याचा सचिन वाझेचा दावा
दिशा सालियन प्रकरणात नाव घेऊन बदनामी सुरु, वकील निलेश ओझाकडे माणसं पाठवली नाहीत : सचिन वाझेची भूमिका 
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Embed widget