एक्स्प्लोर

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेणार : संजय राऊत

खासदार अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी इथल्या घरातून दिल्लीसाठी रवाना झाले. अरविंद सावंत यांचं कुटुंबही शपथविधीसाठी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : शिवसेनेचे दक्षिण मुंबईतील खासदार अरविंद सावंत आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अरविंद सांवत यांचं नाव मंत्रिपदासाठी दिलं आहे. त्यामुळे आज संध्याकाळी सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, खासदार अरविंद सावंत भल्या पहाटे त्यांच्या शिवडी इथल्या घरातून दिल्लीसाठी रवाना झाले. अरविंद सावंत यांचं कुटुंबही शपथविधीसाठी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 मे) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्रीदेखील शपथ घेतील. एनडीएमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी इतर मंत्र्यांचेही शपथविधी होतील. एनडीएतील सेकेंड लार्जेस्ट पार्टी (एनडीएतील सर्वाधिक खासदार असलेला दुसरा पक्ष) असलेल्या शिवसेनेला आता दोन कॅबिनेट मंत्रीपदं आणि एका राज्यमंत्रीपदाची आशा आहे. परंतु आज शिवसेनेचा एकच खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. व्हिडीओ पाहा कॅबिनेट मंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेनेचे काही खासदार गेल्या काही दिवसांपासून लॉबिंग करत आहे. दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी हे तिघेजण त्यामध्ये आघाडीवर आहेत. परंतु अरविंद सावंतांचे नाव फायनल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे स्थान कसं असणार? #मराठीतशपथ मोहिमेला 'माझा'चा पाठिंबा, अनेक खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी | ABP Majha आठवलेंचं मंत्रीपद पक्कं? दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रिपद कायम राहणार का हादेखील सर्वांना प्रश्न आहे. आठवलेंना नाकारले तर त्याची जास्त चर्चा होऊ शकते. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजप आठवलेंना डावलण्याची रिस्क घेणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget