एक्स्प्लोर
...तर युती पुन्हा तोडू, शिवसेना मंत्री रामदास कदमांचा भाजपला इशारा
युती करण्यापूर्वी अडीच-अडीच वर्ष शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली होती, भाजपने अट मान्य केल्यानंतरच युती झाली, अशी माहिती रामदास कदमांनी दिली. भाजपने अट मान्य केली नाही, तर आम्ही उद्धव ठाकरेंना युती तोडण्यास सांगणार असल्याचंही कदम म्हणाले.
मुंबई : हो-नाही म्हणता म्हणता शिवसेना-भाजपची युतीची सुपारी फुटली. मात्र बोहल्यावर चढण्यापूर्वीच शिवसेनेने भाजपला घटस्फोटाचा इशारा दिल्याचं समोर आलं आहे. राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याची अट शिवसेनेने ठेवली आहे. तसं न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे.
शिवसेना-भाजप युती होऊन दोन दिवस लोटत नाहीत, तोच सत्तेच्या गादीवर पुन्हा आरुढ होण्याचं दिवास्वप्न युतीचे नेते पाहू लागले आहेत. युती करण्यापूर्वी अडीच-अडीच वर्ष शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं, अशी अट उद्धव ठाकरेंनी ठेवली होती, भाजपने अट मान्य केल्यानंतरच युती झाली, अशी माहिती रामदास कदमांनी दिली.
VIDEO | अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद न वाटल्यास युती तुटणार? | मुंबई | एबीपी माझा
'मी काल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. विधानसभा निवडणुकीत ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री येईल, असं ते म्हणाले. मात्र हे चुकीचं आहे. त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी बातचित करुन वक्तव्य करावं. नाहीतर असं व्हायचं, की युती झाली आणि काहीतरी उलटसुलट बोलल्यामुळे पुन्हा युती तुटायची' असं रामदास कदम म्हणाले.
'भाजपने अट मान्य केली नाही, तर आम्ही उद्धव ठाकरेंना सांगू की युती तोडून टाका' असं रामदास कदम म्हणाले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर झालेली युती, गेल्यावेळी प्रमाणे निवडणुकांनंतर तुटणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
VIDEO | स्वबळाच्या तलवारी गंजल्या, ढाली झिजल्या का? | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
शिवसेना आणि भाजप यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये युती करण्याची घोषणा 18 फेब्रुवारीला केली होती. शिवसेना लोकसभेच्या 23, तर भाजप 25 जागा लढवणार आहे. विधानसभेत मित्रपक्षांना जागा दिल्यानंतर समसमान जागावाटप करण्याचं ठरलं आहे. जनभावनेचा आदर करत युती करत असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला होता.
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरेंची अमित शाहांना मिठी, शिवसेनेचे होर्डिंग्सच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन
शिवसेना सत्तेसाठी लाचार नाही, आम्ही आमचा बाणा जपला, जपत राहू, 'सामना'त युतीबाबत स्पष्टीकरण
...म्हणून शिवसेनेने भाजपशी युती केली: चंद्रकांत पाटील
जनतेसाठी नाही मातोश्रीच्या स्वार्थासाठी शिवसेना-भाजप युती, नारायण राणे यांची प्रतिक्रिया
युतीच्या तहात जिंकलो आता निवडणुकीच्या युद्धात जिंकायचंय, उद्धव ठाकरेंचं आवाहन
शिवसेनेला 'लकी नंबर 9' विधानसभेच्या जागावाटपात मारक ठरणार?
सेना-भाजप युतीला बारामतीसह 48 जागा मिळतील, पवारांच्या कानपिचक्या
उद्धव ठाकरेंकडून संधीचं राजकारण, राज किमान संधीसाधू नाहीत, मिलिंद देवरांचं मत
दानवेंसोबत मैत्रीपूर्ण लढत, युतीनंतरही अर्जुन खोतकरांची भूमिका, नाराजी उघड
मुख्यमंत्री युतीचा, शिवसेना-भाजप मनोमिलनावर खडसे म्हणतात...
सत्तेसाठी नव्हे, व्यापक जनहितासाठी आम्ही एकत्र आलोय : देवेंद्र फडणवीस
भाजप-शिवसेना युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात...
शिवसेना भाजपच्या युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही खुश, मतविभाजन टळण्याची आशा
शिवसेना-भाजप लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी युती, मुख्यमंत्र्यांची घोषणा
स्वबळाची तलवार म्यान, अफझलखानाशी गळाभेट, लोकसभा-विधानसभेसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement