एक्स्प्लोर

खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला संभाजी-शिवाजी सांगायचं काम करु नये, शिवसेनेची अमोल कोल्हेंवर टीका

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करताच, अवघ्या काही तासात अशा आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकूण आरोप पाहता शिरुर लोकसभेची निवडणूक 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आणि जातीच्या राजकारणात अडकून राहणारी दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड : खोटी दाढी-मिशी लावून आम्हाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज सांगायचं काम करू नये, असा घणाघात मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले आमदार शरद सोनवणेंनी अभिनेते अमोल कोल्हेंवर केला. शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादीकडून शिरुरमधील लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे.

शिरुरमधील शिवसेनेचे संभाव्य उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनीही, मी निधड्या छातीचा मराठा, मी शिवरायांचा पाईक, असं म्हणत मराठा कार्ड बाहेर काढलं.

शिरुर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अमोल कोल्हेंची उमेदवारी जाहीर करताच, अवघ्या काही तासात अशा आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकूण आरोप पाहता शिरुर लोकसभेची निवडणूक 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका आणि जातीच्या राजकारणात अडकून राहणार असल्याचं दिसत आहे.

अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी संभाजी महाराजांच्या मालिकेवर राजकारण न करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विरोधक त्यांना याच मुद्द्यावर घेरणार हे आता स्पष्ट झालं आहे. कोल्हेंनी आधी शिवाजी महाराज आणि आता संभाजी महाराजांच्या भूमिकेतून घराघरात स्थान मिळवलं आहे.

मात्र अमोल कोल्हेंचं लोकांच्या मनातील स्थान डोईजड ठरताना दिसत असल्याचं पाहून प्रतिस्पर्धी आढळराव यांनी देखील त्याच विषयात हात घातला. म्हणूनच शिवजन्मभूमी शिवनेरी गड ते शंभूराजांच्या स्मृतिस्थळी म्हणजेच वढू तुळापूर अशी त्यांनी रॅली काढली. दोन्ही महाराजांचा हा ठेवा शिरूर लोकसभा मतदारसंघातच येतो.

या रॅलीनंतर झालेल्या सभेत बोलताना म्हटलं की, आढळरावांनी मी निधड्या छातीचा मराठा, मी शिवरायांचा पाईक आहे, तेव्हा मला कुणी आव्हान देऊ नये. तर खोटी दाढी-मिशा लाऊन तुम्ही आम्हाला संभाजी-शिवाजी सांगायचं काम करु नका, असा टोला शरद सोनावणे यांनी लगावला.

त्यामुळे शरद सोनावणे आणि आढळराव पाटील यांच्या टीकेनंतर अमोल कोल्हे यावर काय प्रतिक्रिया देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र आरोप प्रत्यारोप करताना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपप्रचार होणार नाही, याची काळजी सर्वांनी घेणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget