एक्स्प्लोर

कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष, शिवसेना राणेंच्या विरोधात लढण्यावर ठाम

कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत लढणार आहेत. सतीश सामंत हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र ते आता नितेश राणेंविरोधात लढत आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना-भाजपची युती झालेली असताना कणकणली, देवगडमध्ये मात्र युती नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात युती झाली तरी कोकणात शिवसेना राणेंच्या विरोधात लढण्यावर ठाम आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र युती झाली असतानाही नितेश राणेंच्या विरोधात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सतीश सामंत लढणार आहेत. कारण सतीश सामंत यांनी शेवटच्या दिवशीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही.

सतीश सामंत हे नारायण राणेंचे कट्टर समर्थक समजले जात होते. मात्र नाराजीनंतर सामंत यांनी राणेंची साथ सोडली आणि शिवसेनेने सामंतांना उमेदवारी दिली.

नारायण राणे आपल्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपने नितेश राणे यांना शेवटच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश देत AB फॉर्म दिला आणि त्यांना कणकवलीतून तिकीट दिलं.

शिवसेना युती धर्म पाळेल आणि नितेश राणेंना सहकार्य करेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. मात्र शिवसेनेने राणेंविरोधात युती धर्म पाळला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोकणातील शिवसेना-राणे संघर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!

व्हिडीओ

Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Maharashtra Live blog updates: मुंबई महापालिका पहिल्यांदाच आणणार ‘म्युनिसिपल बाँड्स’; निधी उभारणीसाठी सेबीकडे प्रस्ताव सादर करणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
Embed widget