एक्स्प्लोर
Advertisement
चार शहरात एकही जागा राहिना....माझं नाव शिवसेना!
सत्तेचं विनिंग कॉम्बिनेशन असलेल्या महायुतीत असूनही शिवसेनेसाठी हा काळ बॅडपॅच ठरतोय की काय अशी स्थिती बनत चालली आहे. कधी काळी महाराष्ट्रात मोठा भाऊ वगैरे असलेल्या शिवसेनेला यंदा पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर या महत्वाच्या शहरांत एकही जागा भाजपनं दिलेली नाही. यामुळे पक्षात बंडाची भाषा सुरू झालीच आहे, मात्र त्यापेक्षाही या महत्वाच्या शहरात शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकणार आहे.
मुंबई: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये एकही जागा लढवली जाणार नाहीये. भाजपच्या आज प्रसिद्ध झालेल्या यादीत या शहरातल्या सर्व जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र, आता या शहरांमधल्या शिवसैनिक, पदाधिकारी, शाखा-विभाग प्रमुखांसमोर पुढे काय? हा प्रश्न उपस्थित राहणार आहे. आपल्याला तिकिट न मिळाल्यास स्वत:च्या महत्वाकांक्षा दाबून किमान 'धनुष्यबाणा'चा तरी प्रचार करणाऱ्या शिवसैनिकांना आता 'कमळा'चा प्रचार करावा लागेल. या जागा निवडून आल्यास भविष्यातही त्या न मिळण्याची शक्यताच अधिक असेल. शिवाय, संघ-भाजपचं जाळं आणि आमदार असताना सामान्य शिवसैनिकांकडे जनता आली नाही, तर या शहरांत पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्नही उभा ठाकणार आहे.
'पितृपक्षामुळे काही अडचण आहे का?', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता, 'आम्हीच खरे 'पितृ'पक्ष' असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं होतं. मात्र, आता जाहीर होणाऱ्या जागा, त्यात शिवसेनेला १३०च्या आता मिळू शकणारा वाटा आणि महत्वाच्या शहरात एकही जागा न मिळणं, हे पाहता राज्यात व युतीत खरा 'पितृ'पक्ष' कोण? हे भाजपनं दाखवून दिलं आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या यादीत मुंबई (३६ जागा) वगळता मुख्य शहरांमधील २९ जागांपैकी शिवसेना फक्त ६ तर भाजप २३ जागा लढविणार आहे. ही सर्व शहरं वाढत्या लोकसंख्येची आहेत. यातील अनेक ठिकाणी भाजप महापालिकेत सत्तेवर आहे. पुणे, नागपूरमध्ये तर नगरसेवक-आमदार-खासदार असे सगळेच भाजपचे आहेत. या स्थितीत शिवसेनेसाठी फक्त ही निवडणूकच नव्हे, तर अस्तित्वासाठीच संघर्ष करावा लागू शकतो. राज्यातील युतीत धाकटेपणा आला असताना आता शहराशहरातही भाजपचं थोरलेपण सेनेला मान्य करावं लागू शकतं.
शहर एकूण जागा सेना भाजप
मुंबई 36 19 17
ठाणे 04 03 01
पुणे 08 00 08
नाशिक 03 00 03
नवी मुंबई 02 00 02
नागपूर 06 00 06
औ.बाद 03 02 01
कोल्हापूर 02 01 01
एकूण 64 25 39
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement