एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर
शिरुरमधील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा प्रश्न विचारत भाजपच्या गोटातील आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांनी असहकाराची भूमिका घेतली आहे.
![मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर Shirur Shivsena BJP dispute मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/22224956/Shivajirao-Adhalrao-Patil-Mahesh-Landge-Shirur.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पिंपरी चिंचवड : मावळनंतर शिरुरमध्येही भाजप-शिवसेनेतील धुसफूस समोर येत आहे. शिवसेनेने शिरुरचे उमेदवार जाहीर होताच भोसरीतील भाजप गटाने बैठक घेतली. आमदार महेश लांडगे यांच्या गटातील सर्व नगरसेवक शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार न करण्याचा मनस्थितीत आहेत.
आढळराव पाटलांनी युती होण्याआधी केलेल्या आरोपांचं काय? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. भोसरी विधानसभा सध्या शिवसेनेच्या कोट्यात असल्याने हे दबावतंत्र वापरलं जात आहे. अपक्ष निवडून आलेले लांडगे हे भाजपमध्ये असल्याने, येत्या विधानसभेत हा मतदारसंघ भाजपला सोडण्याची ग्वाही द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
मावळ लोकसभेत श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला विरोध, बारणे-जगताप वाद पार्थ पवारच्या पथ्यावर पडणार
आमदार लांडगे सावध भूमिकेत असल्याचं बैठकीतील चर्चेतून दिसत आहे. लांडगे युतीधर्म पाळू असं म्हणत असताना त्यांचे समर्थक नगरसेवक मात्र विरोधाची भूमिका घेत आहेत. लांडगे नगरसेवकांना पुढे करुन स्वतःसाठी विधानसभेची जागा निश्चित करत असल्याचीही चर्चा आहे. आधी मावळ लोकसभेचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रचार करणार अशी परिस्थिती असताना आता शिरुरमध्येही भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवकांनी तीच रणनीती अवलंबली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
करमणूक
नाशिक
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion