शिरुर: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरुरचा समावेश आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरुद्ध अजितदादा गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता. गेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे हे आढळराव पाटलांचा (Shivajirao Adhalrao patil) पराभव केला होता. यंदाही ते यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे चित्र पहिल्याफेरी अखेर दिसत आहे.  हे चित्र सकाळी 9 पर्यंतचे आहे. 


शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे पहिल्या फेरी अखेर 9000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. भोसरी विधानसभा मतदार संघाचा अपवाद वगळता  पाचही विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांना  आघाडी  मिळाली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचे आमदार  महेश लांडगे आहेत.   पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 9000 मतांची आघाडी महायुती चे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.  


शिरूर लोकसभा मतदारसंघातील आमदार संख्या – 6



  • जुन्नर– अतुल बेनके (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)

  • खेड-आळंदी – दिलीप मोहिते पाटील

  • शिरूर – अशोक पवार

  • भोसरी – महेश लांडगे (भाजप)

  • हडपसर – चेतन तुपे


48 पैकी दोन मतदारसंघातच अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी


राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्रात बारामती, धाराशिव, शिरुर आणि रायगड या चार जागा लढवल्या होत्या. या ठिकाणी बारामतीत सुनेत्रा पवार, शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव, रायगडला सुनील तटकरे आणि धाराशिवला अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवडणूक लढवली होती. 48 पैकी दोन मतदारसंघातच अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. त्यामध्ये  शिरुर हा मतदारसंघ आहे. 


2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली


अजित पवारांनी अमोल कोल्हेंना आव्हान देत, शिरूर लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्यामुळं अख्ख्या राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे होतं. त्याच शिरूर लोकसभेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) संधी दिली. तर कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग बांधलेल्या अजित पवारांवर उमेदवार आयात करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजी आढळरावांना (Shivajirao Adhalarao Patil) घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची 'वेळ' अजित पवारांवर आली. 2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून त्याचा फटका कुणाला बसणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.