Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharad Pawar) पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा विजय झाला आहे, तर अजित पवारांच्या (NCP Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विजय झाला आहे. बारामतीत (Baramati Loksabha) विजयाचा विश्वास व्यक्त करताना शरद पवार (Sharad Pawar PC) यांनी काही वेळा पूर्वी म्हटलं होतं की, बारामतीतील जनतेची मानसिकता मला माहित आहे. माझी सुरुवात तिथूनच झाली असून मी 60 वर्ष तिथे काम केलं आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे.


बारामतीतील विजयावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया


शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, आम्ही जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो. आमचा प्रयत्न राहणार आहे की, देशात देखील चित्रं आशादायक आहे. उत्तर प्रदेशात देखील चांगला निकाल लागला आहे. यापूर्वी भाजपला जे यश मिळायचं त्यामध्ये मार्जिन मोठं असायचं. आता तसं चित्रं नाही. आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न केलं. मी मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. आज संध्याकाळी याबाबत निश्चित आम्हाला कळेल आणि त्यानंतर आम्ही दिल्लीला जाऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


बारामतीत 60 वर्षांचा कामाचा अनुभव


बारामतीमध्ये या विधानसभेच्या मतदारसंघात माझा स्वत:चा 60 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. माझी सुरुवातच तिथून झाली आहे. तिथला सामान्य नागरिक आणि तिथली मानसिकता मला माहित आहे. मला असं वाटतं की, एका बारामीत विधानसभेत 35 हजारांचा लीड आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.


एकट्या राष्ट्रवादीचं नाही, हे महाविकास आघाडीचं यश


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मर्यादित जागा लढवल्या सगळ्या मिळून आम्ही 10 जागा लढवल्या. या निवडणुकीत आमचा स्ट्रायकींग रेट जास्त आहे. हे यश एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे, असं आम्ही मानत नाही. महाविकास आघाडीचं हे यश आहे. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यासर पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जिवाभावाच्या भावनेनं काम केलं, याचं हे यश आहे. आम्ही तिघेही एकत्र राहून पुढच्या काळात महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करु, असं शरद पवार म्हणाले आहेत.


10 पैकी 7 जागा जिंकणं म्हणजे आमचा स्ट्राईक रेट जास्त


आम्ही 7 जागांवर यश प्राप्त करू असं चित्रं आहे. 10 पैकी 7 जागा जिंकणं मोठं आहे. आमचा स्ट्रइक रेट जास्त आहे. आम्ही महाविकस आघाडी केली त्यांना देखील यश चांगल मिळालं. आम्ही जीवाभावाने काम करण्याची भूमीका घेतली त्यामुळं हे घडू शकलं. आम्ही तिघे देखील एकत्रित राहुन आगामी निवडणुकीला समोर जाऊ. दरम्यान, मी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा केलेली नाही. मी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासोबत चर्चा केली या बातमीमध्ये  कोणतही तथ्य नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.