Uttar Pradesh Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates : देशाच्या लोकसभाचं चित्र ठरवणाऱ्या महत्वाच्या राज्यातील एक राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. पण यावेळी मात्र भाजपच्या पदरी निराशा लागली आहे. भाजपचे उमेदवार फक्त 33 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपचे जवळपास 50 टक्के उमेदवार घटल्याचं चित्र प्राथमिक कलामधून दिसतेय. भाजप आणि आघाडी हे
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत, 851 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपने 80 पैकी 75 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. तर मित्रपक्षाला पाच जागा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Varanasi Election Result 2024) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा मैदानात आहेत, सुरुवातीच्या कलामध्ये मोदींना मोठी आघाडी मिळाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे रायबरेलीमधून (Raebareli Election Result 2024) तर समाजवाजी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव कन्नौज येथून मैदानात आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या काय स्थिती आहे ?
समाजवादी पार्टी (Samajwadi Party - SP) - 36 जागांवर आघाडीवर
भाजप (Bharatiya Janata Party - BJP) - 33 जागांवर आघाडीवर
काँग्रेस (Indian National Congress - INC) - 7 जागांवर आघाडीवर
राष्ट्रीय लोक दल (Rashtriya Lok Dal - RLD) - 2 जागांवर आघाडीवर
आझाद समाज पार्टी (कांशी राम) Aazad Samaj Party (Kanshi Ram) - ASPKR - एका जागेवर आघाडीवर
Apna Dal (Soneylal) - ADAL - एका जागेवर आघाडीवर
अमेठीमधून केंद्री मंत्री स्मृती ईराणी पराभवाच्या छायेत
उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदार संघामध्ये भाजपच्या केंद्री मंत्री स्मृती ईराणी पिछाडीवर आहेत. 14 व्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा 45 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
राहुल गांधी 145254 मतांनी आघाडीवर
रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी 145254 मतांनी आघाडीवर आहेत.
यादव कुटुंबातील पाचपैकी चार उमेदवार आघाडी
समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणुकीत मोठी आघाडी घेतली आहे. समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये 36 जागांवर आघाडी घेतली आहे. अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील पाच उमेदवार मैदानात होते. सुरुवातीच्या कलामध्ये यादव कुटुंबातील चार उमेदवार आघाडीवर होते. कन्नौजमधून अखिलेश यादव भाजपाच्या सुब्रत पाठकपेक्षा 61,351 मतांनी आघाडीवर आहेत. तर मैनपुरी मतदारसंघातून डिंपल यादव भाजपाच्या जयवीर सिंह यांच्यापेक्षा 68,261 मतांनी आघाडीवर आहेत.
आजमगढमधून सपाचे धर्मेंद्र यादव भाजपाच्या दिनेश लाल यादव निरहुआ पेक्षा 45,069 मतांनी आघाडीवर आहे. फिरोजाबादमधून सपाचे नेता राम गोपाल यादवचा मुलगा विश्वदीप सिंह 56,986 मतांनी आघाडीवर आहेत.