Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवारांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सामना झाल्यानंतर आता युगेंद्र पवार आणि अजित पवार एकमेकांसमोर असणार आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंब एकमेकांसमोर असणार आहेत. 


बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार आणि अजित पवार यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही प्रत्येक गावात जाऊन लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील फिरताना दिसत आहेत. यावरुन अजित पवारांनी भाष्य केलं होतं. बोल भिडू या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, शरद पवारांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 


अजित पवार काय म्हणाले होते?


पवार साहेब शेवटच्या सभेला बारामतीमध्ये यायचे, आता त्यांनी 4 सभा घेतल्या आहेत. ते घरोघरी फिरत आहेत. आज बारामतीमध्ये आमच्या आई समान असलेल्या प्रतिभाकाकी देखील बारामतीमध्ये फिरत आहेत. त्या गेल्या 40 वर्षात कधीही घरोघरी जात नव्हत्या. त्याही घरोघरी जात आहेत. असं कधीच घडलेलं नव्हतं. मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे. एकीकडे त्या स्वत: घरोघरी जात आहेत. मग त्या अजितला पाडण्यासाठी जात आहेत का? मी सर्वात जास्त काकींच्या जवळ राहिलेलो आहे. मी त्यांना भेटल्यानंतर विचारणार आहे, असं अजित पवार म्हणाले होते. 


शरद पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर


अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, , नाही यामध्ये साधी गोष्ट आहे. तुम्ही तुमचा विचार सोडला. इतक्या वर्षांचं तुमच्या विचारांचं असोशिएशन सोडलं. याचचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. हे का करताय हे विचारायचं कारणच नाही. विचार सोडला तुमची जी विचारसरणी आहे, त्याच्याशी प्रामाणिक राहायला पाहिजे. ते न करता तुम्ही दुसऱ्या गोष्टी करता, हा संधी साधूपणा आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 


Donald Trump : दोस्तासाठी काय पण! डोनाल्ड ट्रम्प सरकारमध्ये एलाॅन मस्क आणि विवेक रामास्वामींना मोठी जबाबदारी; टीव्ही अँकर संरक्षण मंत्री होणार!