पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना जे शक्य होतं ते दिलं, असं म्हटलं. याशिवाय दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असं म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असं ते म्हणाले. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आजवर मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसेंवर आज शरद पवारांनी थेट गद्दारी केल्याचा शिक्का मारला. भर सभेत शरद पवारांनी असं बोलताच दिलीप वळसेंनी सभेनंतरची पत्रकार परिषद अचानकपणे रद्द केली. शरद पवार आपल्याबद्दल कधी असं बोलतील याचा विचार वळसेंनी कधी केला नसेल पण आज थेट गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असते म्हणत गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. वळसे पाटील यांचा 100 टक्के पराभव करा अन् देवदत्त निकमांना विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.
शरद पवारांच्या सभेनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द केली. पवारांच्या सभेनंतरची पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करत तूर्तास यावर काही न बोलण्याची भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवार आंबेगावच्या सभेत काय म्हणाले?
ते म्हणतात साहेब माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत, आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळं आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले.
आंबेगावात दिलीप वळसे पाटील विरुद्द देवदत्त निकम असा सामना
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जुलै 2023 मध्ये फूट पडली. त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडे सहकारमंत्रीपद देण्यात आलं होतं. दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंबेगाव विधानसभा मतदारंसघातून दिलीप वळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
इतर बातम्या :