Hingoli News : राज्यात विधानासभा निवडणुकीची (Vidhansabha Election) धामधूम सुरु असताना हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावातून एक बातमी समोर आली आहे. या गावात शिवसेना ठाकरे गट (shivsena thackeray group) आणि शिवसेना शिंदे गटात (sivsena shinde group) जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (13 नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दोन गटात राडा झाला आहे. दोन गटातील वाद विकोपाला गेल्याने यात दोन गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तसेच ऐकमेकांना मारहाण देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन करत प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.
ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण, कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या
दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी या गावात दोन गटात राडा झाल्यामुळं वातावरण चांगलच गरम झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या राड्यामध्ये ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळं वाकोडी गावात प्रचारासाठी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, यावर कार्यवाही करावी या मागणीसाठी ठाकरे गटाने कळमनुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत अशी भूमिका ठाकरे गटाचे नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी सुद्धा ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
गाड्यांमधून दारु आणि पैशांचं वाटप, ठाकरे गटाचा आरोप
दिवसाढवळ्या आमदाराचे लोगो लावलेल्या गाड्या येतात. या गाड्यांमध्ये दारु आणि पैसा असतो, हे लोकांवा वाटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. गाड्यांमधून 1000 रुपयांचे वाटप सुरु असल्याचे ते म्हणाले. पोलीस प्रशासन देखील काही करत नसल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. हे सगळं थांबायला पाहिजे. हे जर तांबल नाहीतर आम्ही याला शिवसेना स्टाईलनं प्रत्युत्तर दिल्याशिवाय थांबवणार नसल्याचा इशारा देखील ठाकरे गटानं दिला आहे. अनेक ठिकाणी पैसे वाटप करण्याचे काम सुरु आहे. आमच्या गाड्यांवर हल्ला केला असल्याचे ठाकरे गटानं सांगितले. आमच्या दोन गाड्या फोडल्या आहेत. दोन कार्यकर्ते जखमी झाल्याचे ठाकरे गटांन सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Thackeray Vs Shinde Rada: मुंबईत ठाकरे गट-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, जोगेश्वरीत मध्यरात्री जोरदार राडा