एक्स्प्लोर
मी माझं बोट कोणाला धरु देत नाही, आता दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय : शरद पवार
"मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
दौंड : "मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय", असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यानी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तीन ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कले. यावेळी यवत या गावी बोलताना भाजप सरकार व मोदींवर त्यांनी निशाणा साधला.
शरद पवार म्हणाले ,"मी माझं बोट कोणाला धरु देत नाही. कारण आता दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय. माझं बोट धरुन राजकारणात येणाऱ्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असं म्हणाले. वैयक्तिक टीका करु नये हा राजकारणाचा नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारेल."
...म्हणून हिंदू धर्माचा प्रश्न भाजप काढतंय
'मागील निवडणुकीत विकासाचा मुद्दा काढून भाजप सत्तेत आले पण आता विकास सोडून हिंदुत्वाचा मुद्दा ते पुढे करत आहेत. मंत्रीपदाची शपथ घेताना आपण सर्व जातीच्या धर्माच्या लोकांच्या हिताची जपणूक करु, अशी राष्ट्रपतींसमोर शपथ घेतो. पण आता भाजपचे मंत्री हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या शब्दाला व शपथेला किंमत नाही. आपल्या मनातील गोष्ट करायची व त्यास लोकांचा पाठिंबा नसेल त्यावेळी लोकांना भलत्याच दिशेने न्यायचं, असे त्यांचे काम सुरु असून या गोष्टी चांगल्या नाही. या पद्धतीने देश चालत नाही', अशीही टीका यावेळी पवारांनी भाजप सरकारवर केली.
..तर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे महा-मिलावट
'मोदी आमच्या आघाडीला मिलावट आहे, असे म्हणत टीका करतात. आम्ही काही पक्ष एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे. देशभरात आम्ही सगळे मिळून 26 पक्ष आहोत. पण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे एकूण 36 पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे मोदी जर आम्हाला मिलावट म्हणत असतील तर ते महामिलावट आहेत', अशी बोचरी टीका यावेळी शरद पवार यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement