Sanyukt kisan morcha : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकंच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत संयुक्त किसान मोर्चाची नेमकी भूमिका काय? असी सर्वत्र चर्चा सुरू आहे. यासंदर्भात संयुक्त किसान मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडलेत. यामध्ये त्यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधी मतदान करुन शिक्षा द्या, असे म्हटले आहे. तसेच भाजपला शेतकरी विरोधी सरकार असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे अद्याप पंतप्रधान मोदींनी नाव देखील घेतले नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.


पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये संयुक्त किसान मोर्चाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. कारण, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे तेथील निवडणुकीवर संयुक्त किसान मोर्चाची भूमिका महत्त्वची ठरणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने भाजपविरोधी मतदान करण्यास सांगितले आहे. शेतकरी विरोधी भाजप सरकारला शिक्षा द्या असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.
 
पश्चिम उत्तर प्रदेशमधील जनतेला विकासाची चर्चा करायची आहे. दरम्यान, हिंदू, मुस्लीम, जिना, धर्मावर गप्पा मारणाऱ्यांची मते यावेळी कमी होतील. मुझफ्फरनगर हे हिंदू-मुस्लिम सामन्यांचे स्टेडियम नसल्याचे वक्तव्य संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. दरम्यान, मोदी सरकरने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन भाजप सरकारकडून देण्यात आले होते. केंद्र सरकारने 3 कृषी कायदे मागे घेतले आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे मान्य केले होते. त्यानंतरच सेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर सुरू असेलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.


संयुक्त किसान मोर्चाकडून सरकारकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एमएसपीबाबत (MSP) हमीभाव कायदा करणे आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत या प्रमुख मागण्या आहेत. शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांमध्ये वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. या मागण्यांचा देखील समावेश आहे.