Punjab Assembly Election 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. अखेर काल (रविवार) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत केला आहे. काँग्रेसकडून  विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. चन्नी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे पाहायला मिळाले होते. अखेर काँग्रेस हायकमांडने चन्नी यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा केल्यानंतर चन्नी ट्वीट करुन काँग्रेसचे हायकमांड आणि पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चन्नी यांनी सिद्धू यांना मिठी मारल्याचे पाहायला मिळाले.


कालचा दिवस पंजाब काँग्रेससाठी खूप महत्त्वाचा होता. कारण गेल्या अनेक दिवसांपासून पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरुन चर्चा होती. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी यांनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर चन्नी यांनी काँग्रेस हायकमांडने माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल राहुल गांधींसह पंजाबच्या जनतेचे आभार मानलेत. गेल्या 111 दिवसांपासून मी पंजाबला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. मी तुम्हाला पंजाबला नव्या जोमाने प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे आश्वासन देत असल्याचे चन्नी यांनी 


पंजाब निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा चेहरा घोषीत झाल्याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी राहुल गांधी सतत प्रचारात गुंतले आहेत. चन्नीजी मुख्यमंत्री झाले, त्यांना कोणताही अहंकार नाही, ते लोकांमध्ये जातात असे गांधी म्हणाले. तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेमध्ये जाताना, रस्त्यात एखाद्याला मदत करताना पाहिले आहे का? करणार नाहीत कारण ते राजा आहेत, पंतप्रधान नाहीत असा टोला देखील राहुल गांधी यांनी लगावला. काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आल्यावर सिद्धू यांनी 'चन्नी साहब, टाली ठोको 'असे सांगितले. हे ऐकून चन्नी उठले आणि त्यांनी सिद्धू यांना मिठी मारली. यावेळी सिद्धू यांनी शेर वाचून राहुल गांधींची स्तुतीही केली. 


पंजाबमध्ये काँग्रेसने कोणाच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी या प्रश्नावर 40 टक्के लोकांनी चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाला पसंती दिली आहे. चन्नी यांच्या नेतृत्वातच पंजाबमध्ये काँग्रेसने निवडणूक लढवावी असे लोकांचे म्हणणे आहे. तर 21 टक्के लोकांनी सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. सिद्धू यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली पाहिजे असे 21 टक्के लोकांचे म्हणणे आहे. तर 27 टक्के लोकांनी दोघांच्याही नावाला नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी याबाबत माहित नसल्याचे उत्तर दिले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: