Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते, संजय राऊतांची 'देवाभाऊ', 'एकनाथ भाईं'वर बोचरी टीका; म्हणाले, फडणवीस वेताळाप्रमाणे...
Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर (BMC Election) महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्याच मनात आहे, त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. तर दुसरीकडे यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घालू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जे आकडे आहेत, ते जवळजवळ समसमान आहेत. चारचा फरक आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला. प्रचंड ताकद आणि सत्तेचा वापर करून देखील त्यांना केवळ चारचे बहुमत मिळाले आहे. तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते, असे त्यांनी म्हटले.
Sanjay Raut on Eknath Shinde: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते
उद्धव ठाकरेंना कोणत्या देवाबाबत बोलायचे आहे? मुंबईत महायुतीचा महापौर बसणार आहे ही देवाची इच्छा आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महायुतीचा महापौर बसला असता तर त्यांच्या सहकारी गटाने 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते. जर इतकं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून ठेवले नसते. यावर आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा, त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचे अपहरण झाल्याची तक्रार देखील देऊ शकतात, अशी टीका त्यांनी यावेळी शिंदे गटावर केली.
Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीस वेताळाप्रमाणे हट्टी
देवेंद्र फडणवीस पाच दिवस दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते दावोसला गेले आहेत. ते अनेकदा दावोसला जातात. परंतु, महाराष्ट्रात कधी गुंतवणूक दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक निवडणुकीत असते. नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत असते. त्यामुळे जी गुंतवणूक प्रदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसलेली नाही. दावोसला बसून देखील ते महापालिकेचे राजकारण करणार आहेत तर दावोसला जातातच कशाला? असा म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तर, फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे मान्य होईल का की, अमित शाह यांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा. मी फडणवीस यांना जितकं ओळखतो ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, असा टीका देखील संजय राऊत यांनी केलीय.
आणखी वाचा




















