Sanjay Raut मुंबई : भारतीय जनता पक्ष (BJP) हा जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राज्यात देवेंद्र फडणवीस इत्यादींसारखे मोठे नेते असताना या राज्याचे सरकार अधांतरी लटकून पडलेले आहे. हे कसले मजबूत लोक आहेत? इतके मोठे बहुमत असताना, तसेच सोबत इतर पक्ष असताना राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही, राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करत नाही, राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतलं नाही, असे असताना तुम्ही मांडव घातला? राजभवन तुम्ही चालवत आहात का? मात्र हे सर्व एका गृह खात्याच्या पदावरून अडलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय, असा खळबळजनक दावा करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. 


भाजपने (BJP) जर मनात आणलं तर हे समोरचे जे काही मागण्या करत आहेत त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सर्व डरपोक लोक असून ईडीसीबीआय सारख्या संस्थांना घाबरलेल्या आहेत. शेत जे निवडून आले आहेत ते जनमतावर निवडून आलेले नाही, हे त्यांनाही माहिती आहे. मॅन देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी अन्य कुणाला आणलं जात नाही का? या सर्व गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू, असा इशारा देत संजय राऊत टीका केली आहे. 


...म्हणून आमचं मविआ सरकार पडलं- संजय राऊत 


महायुतीत एकनाथ शिंदे यांना गृहखात या करता हवा आहे की त्यांनी पोलिसांचे सलाम हवे आहेत. पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले, यंत्रणेचा वापर करून  निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला आणि या यंत्रनेचा वापर करून ते उद्या भारतीय जनता पक्षाच्या अंगावर देखील जाऊ शकतात. त्यांची ही वृत्ती आहे आणि विकृती सुद्धा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा खातं हे गृह खात आहे. मुख्यमंत्री गृहखात आपल्याजवळ ठेवतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखात स्वतः कडे ठेवायला हवं होतं. कारण जेव्हा जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायचो त्यावेळी ते सांगायचे की गृह खातं हे दुसऱ्या पक्षाकडे देण्याची चूक उद्धव ठाकरे यांनी करू नये. आमचं देखील तेच म्हणणं होतं. गृहखात, विधानसभेचा अध्यक्ष पद हे संवेदनशील विषय होते. ते आमच्याकडे नसल्याने आमचं सरकार पडलं, नाहीतर ते पडलं नसतं, असे मोठे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 



हे ही वाचा