Vikrant Massey Announce Retirement: बॉलिवूडचा (Bollywood Actor) गुणी अभिनेता विक्रांत मेस्सीनं (Vikrant Massey) टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक. आपल्या करिअरमध्ये विक्रांतनं अनेक वर्सटाईल भूमिका साकारल्यात, ज्यांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. पण, अचानक दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विक्रांत मेस्सीनं इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली. यासंदर्भात त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या भूमिकांनी सर्वांना खिळवून ठेवणाऱ्या दिग्गज अभिनेत्यानं अचानक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते भांबावून गेले आहेत. यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना विक्रांत मेस्सीनं सर्वांना हादरवणारा धक्कादायक निर्णय घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
विक्रांत मेस्सीचा अभिनयातून संन्यास (Vikrant Messi Retires From Acting)
विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सध्या त्याची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलंय की, "नमस्कार, गेली काही वर्ष आणि त्यानंतरची काही वर्ष खूपच शानदार होती. मी तुमच्या अविरत पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण, जसजसा मी पुढे जातो, मला जाणवलंय की, आता रिकेलिब्रेट करणं आणि घरी परत जाण्याची वेळ आली आहे. एक पती, वडील आणि एका मुलाच्या रुपात आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या 2025 वर्षात आपण शेवटचे एकमेकांना भेटू, जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही... शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद, या दरम्यानच्या सर्व गोष्टींसाठी सदैव ऋणी. ”
विक्रांतच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का
विक्रांतच्या या घोषणेनं चाहत्यांना आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्याच्या या निर्णयावर अनेकांनी निराशा व्यक्त केली, एका यूजरनं लिहिलं आहे की, "तुम्ही हे का कराल? तुमच्यासारखा अभिनेता क्वचितच असेल. आम्हाला काही चांगल्या सिनेमाची गरज आहे." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "एका महान करिअरकडे मागे वळून पाहताना..." तर आणखी एका युजरनं लिहिलंय की, "मला आशा आहे की, हे अजिबात खरं नाही."
विक्रांत मेस्सीचे आगामी चित्रपट
विक्रांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, गतवर्षीच, 12th फेलमध्ये आयपीएस मनोज कुमार शर्माच्या भूमिकेसाठी विक्रांत मेस्सीला खूप प्रशंसा मिळाली, त्याच्या ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या फिर आयी हसीन दिलरुबा, या ओटीटीवरच्या चित्रपटातील रिशूनंही प्रेक्षकांची वाह वाह मिळवली. नुकताच अभिनेत्याचा साबरमती रिपोर्ट हा चित्रपट प्रसिद्ध झाला. या चित्रपटाचं खूप कौतुक झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही या चित्रपटासाठी त्याचं कौतुक केलं आहे.