एक्स्प्लोर
Advertisement
ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार, उमेदवारही निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच शरद पवारही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. याचे पोस्टरही मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात संजय दीना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चत झालं आहे. त्यामुळे मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या (7 मार्च) दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणेच शरद पवारही व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. याचे पोस्टरही मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
चेंबुर गोळीबार प्रकरणावर पडदा, मलिक-पाटील दिलजमाई
भाजपचे किरीट सोमय्या सध्या ईशान्य मुंबईतील खासदार आहेत. मात्र निवडणुकीसाठी युतीकडून ईशान्य मुंबईतल्या युतीच्या जागेची उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. परंतु मुंबई पालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान थेट मातोश्रीवर हल्लाबोल करणाऱ्या सोमय्यांचा पत्ता यंदा कट होणार असल्याची चर्चाही रंगली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement