एक्स्प्लोर

गणपतराव देशमुख यांच्या मुलाला डावलत 'शेकापचा गड' सांगोल्यामध्ये उद्योजकाला उमेदवारी

आज मुलाखती दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गणपतरावांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांचाही सहभाग होता. मात्र आजच्या मुलाखतीच्यावेळी गणपतराव देशमुख अनुपस्थित होते.

सांगोला : गेले 55 वर्षे सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार असणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांच्या मुलाला डावलून शेकापने आज उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी घोषित केली आहे. आज सांगोला येथे पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यावर रुपनर यांच्या नावाची घोषणा केली. रुपनर यांचा फॅबटेक उद्योग समूह असून गणपतराव देशमुख यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. आज मुलाखती दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गणपतरावांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांचाही सहभाग होता. मात्र आजच्या मुलाखतीच्यावेळी गणपतराव देशमुख अनुपस्थित होते. शेकापच्या नेत्यांनी मुलाखती घेतल्यानंतर रुपनर यांच्या नावाची घोषणा केली. सांगोला मतदारसंघातील सिंचनाचे बहुतांश प्रश्न गणपतराव देशमुख यानी अंतिम टप्प्यात आणले असून आता बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार असल्याचे उमेदवार भाऊसाहेब रुपनर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 55 वर्षानंतर आता मतदारांना नवीन उमेदवाराला मतदान करायचे आहे, असे सांगत रुपनर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तरी मुलाखत दिलेले इतर उमेदवारही सक्षम असल्याचे गणपतराव देशमुख यांनी सांगितले . मी निवडणूक रिंगणात नसलो तरी शेकापचा उमेदवार निवडून आणणार असून सांगोल्याची जागा कॉंग्रेस आघाडीतून शेकापकडेच असणार असल्याचेही गणपतराव देशमुख यांनी सांगितले. माझं वय 93 वर्ष आहे. आता मी परिणामकारक दृष्ट्या काम करून शकणार नाही. मात्र निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ राजकारण सोडणार नाही. इतक्या वर्षानंतर उमेदवार निवडताना अडचणी येतात. सगळे उमेदवार सारखेच असताना रुपनर यांना उमेदवारी मिळाली. रुपनर यांना आम्ही निश्चितपणे निवडून आणू. पक्षाने दिलेला निर्णय कार्यकर्त्यांना स्वीकारावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget