एक्स्प्लोर

सॅम पित्रोदांना लाज वाटायला पाहिजे, राहुल गांधींचा घरचा आहेर

1984 च्या शीख दंगलीवरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पित्रोदांच्या वक्तव्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी पित्रोदांना लक्ष्य केले आहे.

अमृतसर : 1984 च्या शीख दंगलीवरून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पित्रोदांच्या वक्तव्यानंतर देशभरातील अनेक नेत्यांनी पित्रोदांना लक्ष्य केले आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील पित्रोदांना सुनावलं आहे. "अशा प्रकारचं वक्तव्य करायला सॅम पित्रोदांना लाज वाटायला हवी होती", असे सुनावत राहुल गांधी यांनी पित्रोदांना घरचा आहेर दिला आहे. पित्रोदा यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना "1984 मध्ये जे झालं ते झालं, तुम्ही 5 वर्षात काय केलं ते सांगा?" असे म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. या वक्तव्यावरुन पित्रोदा आणि काँग्रेस सध्या भारतीय जनता पक्षाच्या रडारवर आहेत. राहुल गांधी म्हणाले की, "पित्रोदा यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याची लाज वाटायला हवी, याबाबत पित्रोदा यांनी देशाची माफीदेखील मागायला हवी. पंजाबमधील फतेहगड साहीब या मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अमर सिंह यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने प्रचारसभेचे आयोजन केले होते. या सभेत राहुल बोलत होते." राहुल म्हणाले की, "सॅम पित्रोद यांनी 1984 च्या शिखविरोधी दंगलीबाबत जे काही विधान केले, ते चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी देशाची माफी मागयला हवी. ही गोष्ट मी इथे सार्वजनिकरित्या सांगत आहे की, मी त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. मी त्यांना म्हणालो की, पित्रोदाजी तुम्ही जे विधान केले आहे, ते पूर्णपणे चुकीचे आहे." 1984 च्या दंगलीमुळं खूप त्रास झाला : राहुल राहुल गांधी म्हणाले की, "मला वाटतं सॅम पित्रोदा यांचं मत पक्षाच्या विचारधारेच्या वेगळं आहे, यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. 1984 सालच्या या दंगलीमुळे खूप त्रास झाला. न्याय व्हायला हवा. यासाठी जबाबदार असलेल्या अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी." माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी या प्रकरणी माफी मागितली. माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. ही दंगल आपल्यासाठी एक मोठी दुर्घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सॅम पित्रोदांची माफी दरम्यान पित्रोदा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली असून भाजप आपल्या कमजोऱ्या लपविण्यासाठी शब्दच्छल करत आहे, असे ते म्हणाले. दंगलीसंदर्भात प्रश्न विचारला असता पित्रोदा यांनी गुरुवारी आता 1984 सालच काय आहे? तुम्ही पाच वर्षात काय केलं ते सांगा. 1984 मध्ये जे झालं ते झालं, आताच बोला, असं म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर भाजपने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी हात जोडून माफी मागावी आणि पित्रोदा यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Embed widget