एक्स्प्लोर

भाजप मेळाव्यात राडा : माजी आमदारांना मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघांसह सहा जणांविराधात गुन्हा दाखल

काल, जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली.

जळगाव :  अमळनेर येथे माजी आमदार बी. एस. पाटील मारहाणप्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सहा जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल माजी आमदार बी. एस. पाटील यांना वाघ यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या जाहीर मेळाव्यात मारहाण केली होती. VIDEO | कोणत्या विधानामुळे झाला जळगाव भाजप मेळाव्यात राडा? | एबीपी माझा दरम्यान, मला मारहाण झालेली नसून मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो होतो. भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार पाटील यांना मारहाण करणे निषेधार्ह असून कार्यवाही करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. काल, जळगावमधील अमळनेरमध्ये भाजपच्या मेळाव्यात जोरदार राडा झाला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी मंचावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते. अमळनेरमध्ये काल संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग या वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मंचावरच दोन्ही नेते भिडले. यावेळी चपला बुटांनी एकमेकांना मारलं. VIDEO | माजी आमदार बी.एस.पाटील यांना भाजप मेळाव्यात मारहाण | जळगाव | एबीपी माझा गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बी एस पाटील यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. उदय वाघ यांच्या समर्थकांनी यावेळी स्मिता वाघ आगे बढो, अशी घोषणाबाजीही केली. उदय वाघ हे आमदार स्मिता वाघ यांचे पती आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करुन उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होता. त्याच रागातून ही हाणामारी झाल्याची चर्चा आहे. आज स्मिता वाघ आणि उदय वाघ यांच्या गावात भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्याचीच संधी साधून उदय वाघ आणि समर्थकांनी बी एस पाटील यांना मारहाण केली. यावेळी स्वत: गिरीश महाजन यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या

वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटर एंट्री
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
Embed widget