एक्स्प्लोर

विजयानंतर रोहित पवारांनी घेतली राम शिंदेची भेट आणि म्हणाले......

विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला.

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा तब्बल 43,347 मतांनी पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले. रोहित पवार यांच्या या कृतीचे सर्वच स्थरातून चांगले कौतुक होत आहे. विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला. निवडणूक पार पडली असून मतदार संघातील विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचे, अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना केली. गेल्या २५ वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित पवार यांनी 43 हजार 347 मतांनी राम शिंदेंचा पराभव केला. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मतं मिळाली आहेत. रोहित पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात एकच जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करत रोहित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget