एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंनी स्वकियांचा विरोध पत्करून तिकीट दिलं, 84 वर्षीय रशीद मामूंनी संभाजीनगरमध्ये मशाल पेटती ठेवली, 1300 मतांनी विजयी

मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असणाऱ्या या भागात 84 वर्षांच्या रशीद मामुनी उद्धवसेनेची मशाल पेटती ठेवलीय.

Chhatrapati Sambhajinagar Rashid Mamu: छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक आणि आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर एकच चर्चा आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने रशीद मामूंना पक्षात प्रवेश दिल्यापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तोंडी त्यांचे नाव आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी रशीद मामूंना तिकीट दिल्यावरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. संभाजीनगरचा प्रभाग क्रमांक 4 ब मधून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यांची लढत MIM चे खान अमीर अनवर यांच्याशी होती. पडेगाव भागातून 1300 हून अधिक मतांनी ते निवडून आले आहेत. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असणाऱ्या या भागात 84 वर्षांच्या रशीद मामुनी उद्धवसेनेची मशाल पेटती ठेवलीय.

रशीद मामूंच्या उमेदवारीला स्वकीयांचाच विरोध 

रशीद मामूंच्या उमेदवारीला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचाही कडाडून विरोध होता. रशीद मामू यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात वरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मतभेद झाले होते. रशीद मामूंच्या प्रचारासाठी जाणार नसल्याचेही खैरे यांनी सांगितलं होतं. रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेतील अनेक बडे नेते नाराज असल्याचीही चर्चा होती. शिवसेनेत प्रवेश दिल्यानंतर ही रशीद मामू यांना मशाल चिन्हावर पडेगाव भागातून उमेदवारी देण्यात आली. प्रभाग 4 मधून त्यांनी विजय मिळवलाय. पक्षप्रवेशापासून उठलेली टीकेची झोड ते स्वकीयांची नाराजी ओढवत उद्धव ठाकरेंनी रशीद मामूंना महापालिकेचे तिकीट दिलं. सामाजिक धार्मिक समीकरणे जुळवताना रशीद मामू निवडून येतील का असे चर्चा सुरू झाल्या होत्या. नाराजी ओढवून का होईना ठाकरेंचे 'रशीद मामू' जिंकल्यामुळे शिवसेनेचा जीव भांड्यात पडल्याचं बोललं जातंय. 

संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेची कामगिरी कशी? 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने 94 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाला दोन आकडी विजयही मिळवता आलेला नाही. ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनाही भावाच्या पराभवामुळे फटका बसल्याचा दिसून आलं. एकीकडे बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचा गड राखता आला नाही. दुसरीकडे शिंदे गटाला ही छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 जागाच मिळाल्या असून भाजपने बहुमताचा आकडा गाठल्याचा चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget